नगर – नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने केडगाव
येथील श्री रेणुका माता देवी मंदिरात घटस्थापना
व महाआरतीचा सोहळा अतिशय धार्मिक
वातावरणात पार पडला. या वेळी मंदिर परिसर
भक्तांच्या जयघोषाने, ढोल-ताशांच्या गजराने
आणि फुलांच्या सजावटीने दुमदुमून गेला. हा
सोहळा प्रवीण कोतकर व ज्योती कोतकर तसेच
विजय सुंबे, मोहिनी सुंबे कुटुंबियांच्या वतीने संपन्न
झाला. ग्रामस्थ व भाविक उपस्थित राहून देवीचे
दर्शन घेतले.
या प्रसंगी प्रवीण कोतकर म्हणाले की,
केडगाव येथील रेणुका माता देवी हे भाविकांचे
श्रद्धास्थान आहे. हे मंदिर नवसाला पावणारे
असून या ठिकाणी नवरात्रोत्सव काळात हजारो
भाविक दर्शनासाठी येतात. यंदा अतिवृष्टीमुळे
शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे
जीवनमान उंचवावे व त्यांना धीर मिळावा यासाठी
आम्ही रेणुका मातेला प्रार्थना केली आहे, असे
ते म्हणाले.
नवरात्रोत्सव निमित्त मंदिरात दररोज
महाआरती, देवीची पालखी सोहळा, भजनी
मंडळाचे आयोजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे
आयोजन होणार असून, भाविकांनी सहभागी व्हावे,
असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.