निंबळक – अहिल्यानगर तालुक्यातील नागापूर, निंबळक रोड वरील एमआयडीसी परिसरातील रेणुकादेवी मंदिरात रेणुका देवीच्या माहूरगड येथील देवीसारखाच तांदळ्याची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतरचा पहिला शारदीय नवरात्रोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु झाली आहे. २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या १० दिवसांत सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तिन्ही प्रहरी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. पहाटे आरती व प्रदक्षिणा, दुपारी भजन, कीर्तन, जप व प्रवचन, तर संध्याकाळी संगीतमय पूजा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. सातव्या माळेला देवीची यात्रा भरणार
असून ३० सप्टेंबरला अष्टमी होम, १ ऑक्टोबरला पूजा तसेच २ ऑक्टोबरला दसर्याच्या दिवशी जागरण गोंधळ व रावण दहन होणार असून सांगता
सोहळा होणार आहे.
उत्सवात धार्मिकतेसोबतच सामाजिक
उपक्रम सुद्धा केले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान
शिबीर, रोपवाटप, शालेय साहित्य
वाटप, अनाथाश्रमात अन्नदान
यांचा समावेश आहे. संपूर्ण मंदिर
परिसरात विद्युत रोषणाई करण्यात
आली असून, या ठिकाणी विविध
दुकाने थाटण्यात आले आहेत.
पहिल्या माळेपासूनच पंचक्रोशीतील
भावीकांना दर्शन घेण्यात कोणतीही
अडचण येणार नाही अशी सोय देवस्थान ट्रस्ट
कडून करण्यात आली आहे. संपूर्ण नवरात्र
उत्सवात रेणुका देवीचे मुख्य पुजारी गंगाधर
तुकाराम वाकळे, बाबासाहेब भाऊसाहेब वाकळे,
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, लक्ष्मण
गव्हाणे, बाळासाहेब भुतकर, गोरख चांदबुडे,
साहेबराव भोर, दत्तात्रेय विटेकर, एकनाथ वाघ,
राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, अजित वाकळे,
वैभव आडोळे, अमोल बारस्कर, संजय कातोरे,
गणेश कातोरे, महेश सप्रे व देवस्थान ट्रस्ट चे सर्व
पदाधिकारी व एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील
पोलीस शिपाई उपस्थित राहून भाविकांना सहकार्य
करणार आहेत.