रोटरीचा स्टडी अ‍ॅप वंचित समूहातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त

0
53

नगर – वंचित समूहातील विद्यार्थ्यांसाठी रोटरीचा एसएससी स्टडी अ‍ॅप शिक्षणाचा नवा आधार असून या द्वारे डिजिटल
शिक्षणाच्या आधारे गुणवत्ता वाढविण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. या अ‍ॅपचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांनी करून परीक्षेत चांगले गुण मिळवून यश संपादन  रणे गरजेचे आहे. शिक्षण हेच खर्‍या अर्थाने विकासाचे साधन असून, या डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना नवे क्षितिज खुलं होणार असल्याचे सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी सांगितले.
सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, रोटरी क्लब ठाणे, रोटरी ई-क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथ अहिल्यानगर तसेच आयआरडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने एसएससी स्टडी अ‍ॅपचे अनावरण आणि वितरण सोहळा सीएसआरडी महाविद्यालयात
पार पडला. या उपक्रमाअंतर्गत या एसएससी स्टडी अ‍ॅपच्या कुपनचे वितरण करण्यात
आले तसेच त्याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी अहिल्यानगर शहर व
जिल्हा तसेच राज्यातील विविध शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. रोटरी क्लब
ठाणे यांच्या वतीने हे अ‍ॅप विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची
माहिती यावेळी देण्यात आली.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
खास तयार करण्यात आलेल्या
या अ‍ॅपमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम
डीजीटल स्वरूपात असून
यामध्ये मार्गदर्शक व्हिडिओ,
प्रश्नपत्रिका तसेच महत्वाचे प्रश्न
उपलब्ध करून देण्यात आले
आहेत. यामुळे विद्यार्थी आधुनिक
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अभ्यास
करू शकतील. ग्रामीण तसेच
शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हे
अ‍ॅप एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन
ठरणार आहे. असल्याचे मत प्रकल्प प्रमुख डॉ. बिंदू शिरसाठ यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, रोटरी क्लब ऑफ
ठाणेचे युथ सर्व्हिस डायरेक्टर संतोष आंबेकर, प्रकल्प प्रमुख श्रावणी आंबेकर, कमिटी
सदस्य रेहाना शेख, अल्ताफ शेख तसेच अहिल्यानगर रोटरी ई-क्लब ऑफ एम्पॉवरिंग
युथच्या अध्यक्षा संगीता चंद्रन आणि प्रकल्प प्रमुख डॉ. बिंदू शिरसाठ उपस्थित होते.
यावेळी संतोष आंबेकर यांनी या अ‍ॅपच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली.
सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले. संगीता चंद्रन यांनी आभार मानले. या
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीएसआरडी महाविद्यालयाचे कर्मचारी व विदयार्थी यांनी
परिश्रम घेतले