नगर – अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील सौ. आशा वसंत आमले यांची श्रमिककल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भिल्ल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ठाकरे, राम शिंदे, अविनाश लाहोर, भरत धुरपते, किशोर भिंगारे, श्रीकांत सुरम आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे म्हणाले की, संघटनेमध्ये महिलांचा सहभाग हा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. आशा आमले यांच्या समाजसेवेतील कार्याचा व सामाजिक भानाचा
विचार करून त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे महिलांना संघटनेत मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल, तसेच कामगारांच्या प्रश्नांबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना नवी दिशा मिळेल. आशा आमले
यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील महिला कामगार चळवळीला बळकटी येईल, असा विश्वास आहे. सौ. आशा आमले म्हणाले की, माझ्यावर संघटनेने दाखविलेला विश्वासाला तडा न जाऊ देता मी या पदाच्या माध्यमातून महिलांच्या समस्या,
त्यांचे हक्क व कल्याण यासाठी कटिबद्ध राहीन. कामगार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि संघटनेचे बळ वाढविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. समाजहिताच्या कार्याला नेहमीच प्राधान्य देऊन संघटनेच्या कार्यात महिलांचा
सक्रिय सहभाग वाढविण्याचा माझा संकल्प असणार असल्याची भावना व्यक्त केली.