विचार भारती व बन्सीमहाराजच्या गणेशोत्सव उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व भिंगार येथील समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम

0
52

नगर – अहिल्यानगर मध्ये विचार भारती व बन्सीमहाराज मिठाईवाले यांच्या संयुक्त विद्यमानेघेण्यात आलेल्या गणेशोत्सव उत्कृष्ट आरास स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभात पुण्याचे शिवशंभु व्याख्याने निलेश भिसे यांनी उपस्थित गणेश मंडळांच्या युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप, विश्व मांगल्य संस्थेच्या अध्यक्षा धनश्री विखे व महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, स्पर्धेचे प्रायोजक बन्सीमहाराज मिठाईवालेचे राजकुमार जोशी, विचार भातीचे सचिव सुधीर लांडगे, मंजुश्री कुलकर्णी, स्पर्धा प्रमुख रवींद्र बारस्कर, अंकुश गोळे, सर्व परिक्षक, विविध क्षेत्रातील नागरिक आदींसह मंडळांचे कार्यकर्ते व ढोल पथकातील वादक उपस्थित होते. अनंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अंकुश गोळे यांनी आभार मानले. प्रारंभी रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्व.माधव कुलकर्णी व व.गजानन मेहेंदळे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. अशोक गायकवाड, डॉ.विक्रम दीडवाणिया, सुनील नागोरी, राहुल गांधी, समाप्त नलावडे, मनोज जोशी, राहुल जामगावकर, कमलेश भंडारी, विशारद पेटकर व श्री.भिंगारदिवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन
केले. उत्कृष्ट देखावा स्पर्धेचा निकाल पुढीलय्प्रमाणे – प्रथम विभागून श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ तोफखाना देखावा धर्मवीर
छत्रपती शिवाजी व समर्थ युवा प्रतिष्ठान भिंगार देखावा स्वराज रक्षक ताराराणी, द्वितीय विभागून सम्राट तरुण मंडळ भिंगार
देखावा शिवराज्याभिषेक सोहळा व शिवगर्जना प्रतिष्ठान माणिक चौक देखावा सिंदूर देश के बेटी का. तृतीय बंगाल चौकी मित्र मंडळ देखावा दमडी. चतुर्थ विभागून नंदनवन मित्र मंडळ देखावा आई हिरकणी व चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट देखावा गड किल्ले संवर्धन. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके राजयोग प्रतिष्ठान, समझोता तरुण मंडळ, क्रांतिवीर प्रतिष्ठान, बालाजी युवक मंडळ, जय हिंद तरुण मंडळ, नवग्रह मित्र मंडळ, राजमुद्रा प्रतिष्ठान व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान. तसेच शहरातील सर्व ढोल पथक रुद्रवंश, रुद्रनाद, तालयोगी, गणांत, युगंधर, हिंदवी, शौर्य, नाद, रामराज्य, आम्ही नगरकर, श्री विशाल वाद्य पथक ढोल ढील पथकांचा विशेष सन्मान करण्यात आला.