दैनिक पंचांग रविवार, दि. २ जून २०२४

0
150

अपरा (स्मार्त) एकादशी, शके १९४६
क्रोधीनामसंवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, रेवती
२५|४०
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल.

वृषभ : आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. निश्चितेने काम कराल. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. अडकलेल्या कामात सुधारणा होईल.

मिथुन : अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. पारिवारिक वाद विकोपास जातील. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगताल.

कर्क : वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील.

सिंह : व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.

कन्या : आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांरसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल.

वृश्चिक : अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वेळ सत्कारणी लागेल.

धनु : अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील.

मकर : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

कुंभ : नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. अनपेक्षित फायदा करून देणार्यू काही घटना घडतील. सामाजिक यश.

मीन : अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्यांयवर थोपू नका. वेळेच महत्व समजावून घ्याल. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही. आनंदाची बातमी मिळण्याची शयता आहे. आरोग्य उत्तम राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर