स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

ती एकटी. अबोल राहू लागेल आणि एकूणच तिच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम जाणवतील. तुम्हीच सहजपणे व सकारात्मक भूमिकेतून पाळीचा स्वीकार करा. त्याबद्दल तिच्या कलेने योग्य शास्त्रीय माहिती द्या. तिला घरातल्या सदस्यांची भीती वाटता कामा नये. भविष्यामध्ये एखादी दुर्दैवी घटना चुकून तिच्या आयुष्यात घडली तर त्याविषयी किंवा तिच्या भावभावनांविषयी तिला त्याबद्दल तुमच्याशी मोकळेपणाने बोलता आले पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट धाकाने किंवा उपदेश करून सांगायचा प्रयत्न केला तर तिचा स्वाभिमान दुखावतो. म्हणून कोणतीही गोष्ट समजावून सांगताना, उपदेश न करता तिच्याशी प्रेमाने, आपुलकीने, मैत्रीच्या भावनेने संवाद साधावा, कुठल्याही बाबतीत शंका घेणे, बंधन घालणे असे करू नये. तिला शिस्त जरूर लावावी, काय योग्य व काय अयोग्य याचे ज्ञान तिला द्यावे व आत्मनिर्भर बनवावे.

जर तिच्यावर सारखा संशय घेतला तर ती उर्मटपणे उत्तर देईल किंवा घाबरून नकारात्मक विचारांनी ग्रासली जाईल. घरांतील सदस्यांपासून दुरावून बाहेरील प्रेमाचा शोध घेईल व एखाद्याच्या फसव्या जाळ्यात अडकेल. त्यामुळे घरातील वातावरण हे हसतेखेळते असावे. जसजशी ती मोठी होईल, तसतसे तिला पूर्ण लैंगिक शिक्षण द्यावे. या शिक्षणामुळे तिला समाजातील विकृत धोके समजतील. या लैंगिक शिक्षणामुळे ’नाही’ म्हणायचे धाडस व ठामपणा तिच्यामध्ये येईल; ती स्वत:चे संरक्षण करू शकेल, याकरिता तिला कराटेसारखे स्वसंरक्षणाचे शिक्षण द्यावे.

या किशोरावस्थेत आपल्या मुलीच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत याकरिता चांगल्या लेखकांची, ज्यांनी जीवनामध्ये संघर्षमय परिस्थितीशी झगडून यश मिळवले आहे अशा व्यक्तींची पुस्तके वाचायला द्यावीत. आपल्या मुलीला वाईट विचार असणार्‍या, उडाणटप्पू मुलामुलींची संगत लागणार नाही याची काळजी घ्यावी. याकरिता आपल्या मुलीच्या जास्तीत जास्त संपर्कात राहावे. तिच्या मित्र-मैत्रिणींची, त्यांच्या घरच्यांची माहिती करून घ्यावी. त्यांना घरी बोलावून गप्पा माराव्यात. आपली मुलगी जास्तीत जास्त चांगल्या वातावरणात राहील व तिचे मन छंदामध्ये कसे रमेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपली मुलगी टीव्हीवर कोणता कार्यक्रम बघते, इंटरनेटवर काय पाहते आहे याची नोंद घ्यावी. तिच्या शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना भेटून अभ्यासातील प्रगती समजून घ्यावी.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा