स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

म्हणून त्याला हात लावणे, कुरवाळणे या क्रिया नकळत होतात. परंतु कधीतरी नकळत एखाद्या व्यक्तीसमोर ही क्रिया घडली तर ते अतिशय वाईट दिसते. म्हणून अशा ठिकाणी हात लावणे टाळलेलेच योग्य असते बरं का? त्यानंतर मासिक पाळीच्या काळात घेण्याच्या शारीरिक स्वच्छतेचीही माहिती मी श्वेताला दिली.

श्वेता, तुला एक सांगायचे म्हणजे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर शारीरिक स्वच्छता ठेवावी. पाळीच्या दिवसांमध्ये रोज सकाळी गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी. यामुळे पोट, कंबर, पाय हे भाग शेकले जातात व त्या भागांतील वेदना कमी होऊन आरामदायी वाटते, योनिभागाची स्वच्छता राखावी. अंतर्वस्त्राच्या आतून मऊ, सुती कापडाची जाडसर घडी घ्यावी. परंतु ही घडी मागेपुढे होऊ शकते, त्यापेक्षा बाजारात मिळणारे सॅनिटरी पॅड वापरावेत, ते अंतर्वस्त्राच्या आतून घट्ट बसवता येतात. त्यामुळे रोजची कामं करताना, खेळताना, सायकल चालवताना त्याची जागा शक्यतो बदलत नाही.

सॅनिटरी पॅड हा मोठ्या आकाराचा, चांगल्या प्रतीचा वापरावा म्हणजे तो रक्तस्रावाचे व्यवस्थित शोषण करून घेतो. त्यामुळे कपड्यांवर डाग पडून चारचौघांत कानकोंडे होण्याची वेळ येणार नाही. काहीजणींच्या बाबतीत, सुरुवातीला बीजकोषांमध्ये प्रत्येक महिन्याला बीजनिर्मिती होत नसल्याने सहा महिने ते एक वर्षे मासिक पाळी अनियमित असते. साधारणत: एक वर्षभरात पाळी नियमित सुरू होते. पाळीच्या तारखेच्या आधी दप्तरामध्ये सॅनिटरी पॅड ठेवावे. म्हणजे ऐन वेळेला शाळेत जरी पाळी आली तरी फजिती होणार नाही. वापरण्यास सोपे व स्पर्शाने मऊ असल्याने शक्यतो पॅडच वापरावेत. वापरून झाल्यानंतर ते कुठेही टाकून देऊ नयेत. छोट्याशा कागदामध्ये पॅडची पुडी बांधून कचराकुंडीतच टाकावी. पॅड खूप भिजला तर एखादा डाग बाहेरच्या कपड्यांवर पडून फजिती होऊ शकते. म्हणून तीनचार तासांनी पॅड बदलून टाकावा.

श्वेताला समजावून सांगितल्यानंतर तिच्या चेहर्‍यावर आत्मविश्वासाचे हास्य उमटले व ती मला म्हणाली, क्यू डॉक्टर त्यानंतर मी तिला म्हणाले, काहीही अडचण वाटल्यास मला कधीही विचारू शकतेस. आता थोडा वेळ तू बाहेर थांब, मी आईला पाठवते. श्वेता बाहेर गेल्यानंतर मी तिच्या आईशी बोलले. तुमची मुलगी स्त्रीत्वात पदार्पण करत आहे. तिच्यात होणार्‍या शारीरिक आणि मानसिक बदलांचे ज्ञान तिला विश्वासात घेऊन करून देणे महत्त्वाचे असते आणि हे आईशिवाय कुणीही करू शकत नाही. तुम्हीच जर तिच्या वयात येण्याचा मानसिक त्रास करून घेतला तर तुमच्या मुलीचा आत्मविश्वास कमी होईल.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा