राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त मोफत प्रशिक्षण वर्ग

अहमदनगर- नगरमधील प्रतिबिब शिक्षण संस्थेच्यावतीने राष्ट्रीय विणकर दिन दिल्लीगेट येथील स्पार्कल इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आद्यवस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा अनुजा कांबळेंसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

महेश कांबळे यावेळी बोलताना म्हणाले, साळी, कोष्टी, पद्मसाळी आदी विणकर समाजातील लोक हे मुळातच कलावंत आहेत. त्यांनी आपला परंपरागत हातमाग व्यवसाय बंद झाल्यावर इतर कलेचे क्षेत्रामध्ये गेले पण समाजात आजही बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी एसबीसी समाजातील गरजू व गरीब मुलींना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर इतर समाजातील युवतींना ना-नफा ना तोटा या तत्त्वावर सामावून घेण्यात येणार आहे.

संस्थेने एप्रिल महिन्यात साळी समाजातील सर्व महिला, मुली व मुलांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या सहकार्याने नगरमध्ये आयोजित केले होते. त्यासही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर व फोटोग्राफी, नेलं आर्ट, मेहंदी व इतर प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी शहरातील विविध संस्था व संघटनेच्या सहकार्याने 16 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. समाजातील युवक-युवतींनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेवून आत्मनिर्भर व्हावे याकरीता हे सुरू करण्यात आले असून, वय वर्षे 15 च्या वरील कोणीही बंधू-भगिनी सहभागी होऊ शकते.

प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य प्रशिक्षणार्थीना स्वतः आणावे लागेल, प्रशिक्षणवर्ग पूर्ण करणार्‍यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय/ निमशासकीय स्तरावरील कर्ज योजना यांच्यामाहिती द्वारे मदत करण्यात येईल. तरी इच्छुकांनी आपल्या माहितीसह अर्ज प्रतिबिंब शिक्षण संस्था, स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकेच्या जवळ, दिल्लीगेट, अहमदनगर येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी व्हाट्सअप 9822118913/ 9284930674 वर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकानी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा