एक गाव सुकेशीनीचे!

काही काही गावांचे एक वेगळेच वैशिष्ट असते. ‘जुळ्यांचे गाव’, ‘मुलींचे गाव’ अशीही गावं या पृथ्वीतलावर आहेत. चीनमध्ये एक गाव असे आहे जिथे लांबसडक केस असलेल्या महिला मोठ्या संख्येने आहेत. गुआंगशी प्रांतातील हे हुआंगलुओ नावाचे गाव ‘सुकेशिनींचे गाव’ म्हणूनच ओळखले जाते.

तेथील महिलांचे केस तीन ते सात फूट लांबीचे आहेत! या गावात सध्या 60 महिला असून या सर्वांचे केस अतिशय लांब आहेत. केस वाढवण्याची गावाची दोनशे वर्षांपासूनची परंपराच आहे. या महिलांचे दाट, काळेभोर आणि लांब केस पाहून गावाला ‘लॉंग हेअर व्हिलेज’ असे नाव पडले. तिथे दरवर्षी 3 मार्चला ‘लॉंग हेअर फेस्टिव्हल’ ही साजरा केला जातो. यावेळी तेथील या सुकेशिनी महिला गाणे गात, नृत्य करीत आपल्या लांबसडक केसांचे प्रदर्शन करतात. विशेष म्हणजे या महोत्सवात केवळ विवाहित महिलाच सहभागी होऊ शकतात. ज्यावेळी एखादी तरुणी अठरा वर्षांची होते त्यावेळी तिचे केस कापले जातात. त्याचा अर्थ ती तरुणी वयात आली असून विवाहयोग्य बनली आहे. त्यानंतर तिचे केस कधीच कापले जात नाहीत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा