वधू-वर मेळावा समाजाला एकत्र करण्याचे माध्यम -प्रा.दिलीप गायकवाड

नगर -समाजाला एकत्रित करण्याचे माध्यम म्हणून नावलौकिकास पात्र ठरत असलेला हा वधू-वर मेळाव्याचा स्त्युत्य उपक्रम दिवसेंदिवस आता सामाजिक बांधिलकी जोपासून पुढे जात आहे. हे कार्य करत असतांना मोठे पाठबळ नसले तरी छोट्या घटकांच्या योगदानावरच हा उपक्रम यशस्वी होत आहे.

आज समाजाला अशा उपक्रमांची गरज आहे. ज्यावेळेस मुला- मुलींचे शिक्षण पूर्ण होते. त्यावेळी आपल्या उपवर मुलींच्या लग्नाची चिंता लागते, मुलींचे शिक्षण, मुलांची नोकरी, व्यवसाय यात हे सर्व तपासून पाहूनच पालक आपल्या मुला-मुलींचे लग्न जमवत असतात. अशा या वधू-वर मेळाव्यामुळे पालकांना अनेक उपवर वधू-वरांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने अनुरुप असा जोडदार निवडण्यास चांगली मदत होत आहे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी प्रा.दिलीप गायकवाड यांनी केले.

दि बुद्धिस्ट वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने बौद्ध जन वधू-वर मेळाव्याप्रसंगी प्रा.गायकवाड बोलत होते. याप्रसंगी निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रभाकर साळवे, महेंद्र पवार, सुनिल बोराडे, संयोजक भाऊसाहेब देठे आदि उपस्थित होते. याप्रसंगी संयोजक बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे म्हणाले, दि बुद्धीस्ट वधू-वर केंद्राच्यावतीने वर्षभर अशाप्रकारे मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असते. त्यातून अनेकांची लग्न जमले आहेत. या वधू-वर मेळाव्यास दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात आणखी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.

आजच्या वधू-वर मेळाव्यात नोंदणी झालेल्या वधू-वरांची माहिती व छायाचित्र असलेली पुस्तिका तयार करण्यात येणार आहेनेकांची प्राथमिक पसंत या मेळाव्यात झाली. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा