शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सायंकाळी नगरमध्ये सभा

अहमदनगर- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी (दि.9) नगर जिल्हा दौर्‍यावर आले असून नगर शहरात सायंकाळी 6 वाजता त्यांची प्रचारसभा होणार आहे.

ठाकरे यांनी दुपारी संगमनेर येथील शिवसेनेचे उमेदवारी नवले यांच्या प्रचारासाठी जाहिर सभा घेतली. त्यानंतर दुपारी पारनेर येथे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता नगर शहर मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवारी अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची नंदनवन लॉन्स येथे जाहिर सभा होणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा