आयुष्यातील सर्वात मूळ समस्या म्हणजे आपला स्वतःचा असमाधानी स्वभाव

 


आपण सगळेच शांतता आणि सद्भाव यांच्या शोधात असतो कारण आपल्याला आपल्या जीवनात याचीच फार उणिव भासत असते. आपल्या सगळ्यांनाच आनंद हवा आहे. आनंद मिळवणे हे लक्ष्य गाठण्यासाठी अधिकाधिक अपेक्षेने त्याच्या दिशेने प्रयत्न करत असतो. त्याचवेळेस आपण आयुष्यात असमाधाकारक गोष्टीही अनुभवतो. जसे भेदभाव, त्वेश, दुःख, वेदना, विचलितता इत्यादी.

आपला वैयक्तिक असमाधानीपणा आपल्यापुरताच मर्यादित असतो. तसेच आपण आपले दुःख नेहमीच इतरांशी वाटून घेत असतो. आनंदी नसलेल्या व्यक्तीच्या सभोवतालचे वातावरण नेहमीच आंदोलनात्मक असते. अशाच प्रकारे वैयक्तिक ताण हा समाजाचा ताण बनत जातो. आयुष्यातील सर्वात मूळ समस्या म्हणजे आपला स्वतःचा असमाधानी स्वभाव होय. अशा गोष्टी ज्या घडाव्यात असे आपल्याला वाटते त्या घडत नाही व ज्या गोष्टी घडू नयेत असे वाटतात त्याच घडतात.

जीवनाच्या आलेखाचे स्पष्टीकरण
जवळजवळ पंचवीस शतके आगोदर उत्तर भारतात, एका माणसाने मनुष्यपिडांच्या समस्यांचा शोध घ्यायचे ठरवले. ब-याच कालावधीच्या प्रयत्नांनंतर, वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केल्यानंतर त्याने शोध लावला की माणसाचा मूळ स्वभावच त्याच्या या परिस्थितीला कारणीभूत असतो व ही परिस्थिती त्या समस्यांमधून मार्ग काढताना आलेली असते. दुःख व संघर्षाच्या शोधार्थ सर्वोच्च शिखर गाठल्यावर त्यानि  त्यांचे  उर्वरित आयुष्य इतरांना त्यांचा योग्य मार्ग दाखवण्यासाठी व इतरांच्या मदतीसाठी व्यतित केले. त्या थोर व्यक्तीचे नाव होते सिद्धार्थ गौतम ज्यांना आपण गौतम बुद्ध ह्या नावाने ओळखतो.

गौतम बुद्धने कधीही कोणत्याच धर्माचा किंवा एखाद्या विशिष्ठ धर्माच्या शिकवणीनुसार पाठ दिला नाही. ते या शिकवणीलाच धर्म असे संबोधायचे. धर्म म्हणजेच नियम, कायदा, निसर्गाचा नियम जो एखाद्याने अनुभवला व पडताळला आहे. गौतम बुद्ध नेहमीच सत्याच्या अनुभवांना सर्वात जास्त महत्त्व द्यायचे. जे त्यांनी स्वतः अनुभवले, ते त्यांनी नेहमीच शक्य तितक्या सरळ व प्रांजळपणे समजावले. जेणेकरुन इतरांना सत्याची खरी अनुभूती व्हावी व योग्य ते मार्गदर्शन लाभावे. सत्याचा खरा अनुभव घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःमधे झाकून पहाणे. आपण सर्वांनी स्वतःला आपल्या जीवनात फक्त बाहेर बघण्यासाठी अभ्यासित केले आहे. आपल्याला फक्त बाहेर काय घडते आहे किंवा इतर काय करत आहेत यातच रुची राहीली आहे. आपण आपली मानसिक व शाररिक बांधणी कशी आहे, आपले वागणे कसे आहे, आपले सत्य किंवा वास्तविकता काय आहे. आपण स्वतःचे निरिक्षण कधीच करत नाही. यामुळेच आपले स्वतःला ओळखणे राहून गेले आहे. आपल्याला हे माहितदेखील नाही की या दुर्लक्ष करण्याने आपण स्वतःचे किती नुकसान करून घेत आहोत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा