स्वामी विवेकानंद जनकल्याणची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

भिंगार – सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्टची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनी अध्यक्ष प्रमोद मुळे हे होते.

सभेत एकूण सात विषय होते. यामध्ये संस्थेच्या ज्ञापन व नियम- नियमावली बदलास सहाय्यक धर्मादाय आयुक्त अ.नगर यांच्याकडून मिळालेल्या मंजुरीनुसार पुढील कार्यवाहीस मान्यता देण्यात आली.

याप्रसंगी इ.10 वीतील सृष्टी किरण देवतरसे, श्रुती श्रीकांत नांगरे, अनिकेत विद्याधर देशपांडे, श्रेया कैलास सोनटक्के, मधुर रुपेश भंडारी व इ.12 वीतील प्रद्युम्न राम घुले, ऋतुजा विजय कवडे, अनिरुद्ध विद्याधर देशपांडे तसेच पदवी व पदव्युत्तर मध्ये चमकलेले डॉ. सौ.प्रणाली राहूल त्रिमुखे ((MD – फुफ्फुस रोग तज्ञ) आदित्य लक्ष्मीकांत नांगरे (BE, IT), विनीत वसंत राठोड (BE – पेट्रोलियम), मिहीर किरण मुळे (MS अमेरिका) यांना गौरविण्यात आले. वयाची 70 वी पूर्ण केल्याबद्दल सौ.सुजाता सुधाकर झांबरे, राज्य रेखाचित्रशाखा कर्मचारी संघटना सहखजिनदारपदी निवड झाल्याबद्दल किरण मुळे तर संस्थेस सहकार्य करणारे श्रीमती प्रमिला कुलकर्णी, सचिन नाबरिया, नंदलाल जोशी, गणेश तोतरे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. विलास मढीकर नगरसेविका सौ.शुभांगी साठे यांचा विशेष सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी उपाध्यक्ष सुभाष त्रिमुखे यांनी स्वागत केले. संस्थेचे दिवंगत सभासद शरदराव जोशी (गुरुजी), रमेश शेटे (सर) तसेच शहीद जवान यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्याध्यक्ष सुधीर कुलट यांनी अहवाल वाचन केले. जमाखर्च अहवाल वाचन खजिनदार कृष्णा पराते यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त सचिव अशोक एकबोटे यांनी वाचून दाखवले.

यावेळी नंदकुमार झंवर, वैभव जोशी, वसंत राठोड, डॉ.राहुल त्रिमुखे, डॉ.सौ.प्रणाली त्रिमुखे सौ.सुरेखा जाजू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थेचा पारदर्शक कारभार हाच विश्वास आहे. हाच उन्नतीचा महामार्ग आहे, असे ते म्हणाले.

संस्था गेली 24 वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक व सेवाविषयक कार्य अथकपणे करीत आहे. पदाधिकारी संचालक सभासद निधीदाते यांच्या बहुमोल सहकार्याने संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल चालू झाली आहे, असे मुळे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आदी थोर व्यक्तिची जयंती, गरिब गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, इ.10 वीची परिक्षा फी, 21 वर्षांपासून विवेकानंद व्याख्यानमाला, 18 वर्षांपासून रक्तदान शिबीर, जागतिक महिलादिन आदी उपक्रम सभासदांच्या सहकार्याने राबविले जातात.

शेवटी संचालक विठ्ठलराव लोखंडे यांनी आभार मानले. सभा यशस्वीतेसाठी शिवप्रसाद काळे, प्रकाश मुळे, सुभाष रासने, श्रीपाद मुंगी, चंद्रशेखर चौधरी, रुपेश भंडारी, सौ.सुजाता झांबरे, सौ.विजया देशमुख, सौ.शशिकला शेंडे यांनी प्रयत्न केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा