सर्वसामान्यांना परवडेल अशी सेवा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

‘सुरभि’ त एन्डोस्कोपी, नवजात अर्भक व बालरोग अतिदक्षता विभाग सुरू

अहमदनगर- रुग्णांच्या नजरेत डॉक्टरांचे स्थान हे देवासमान असते. सामाजिक क्षेत्रात डॉक्टरांचे स्थान हे मानाचे स्थान आहे. समाज व्यवस्था घडविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. वाढत्या प्रदुषणामुळे वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण हे वाढले आहे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची वाढ ही झपाट्याने होत आहे. वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक घटकाने सर्वसामान्य रुग्णांना परवडेल, अशी सेवा द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

पाईपलाईन रोडवरील सुरभि हॉस्पिटलमध्ये नवीन अत्याधुनिक एन्डोस्कोपी युनिट व नवजात अर्भक व बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी करून हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. राकेश गांधी, डॉ. अमित पवळे, डॉ. विलास व्यवहारे, सुनील आवारे, डॉ. महेश कवडे, डॉ. वैभव अजमेरे, डॉ. आशिष भंडारी आदी उपस्थित होते.

श्री. द्विवेदी पुढे म्हणाले की, सुरभि हॉस्पिटलने नेहमी शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली आहे. शिबिरे ही खर्‍या अर्थाने रुग्णांचा मोठा आधार आहेत. समाजामध्ये अनेक घटक असे आहेत की ते महागडी वैद्यकीय सेवा घेऊ शकत नाहीत. परंतु शिबिराच्या माध्यमातून त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. परंपरागत वैद्यकीय सेवा व आत्ताची वैद्यकीय सेवा यात खूप मोठा बदल झालेला आपणास दिसून येतो. काळानुसार आता सर्वांनी बदलले पाहिजे. सुरभि हॉस्पिटलने अल्पावधीतच रुग्ण सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला. हॉस्पिटलने सुरू केलेल्या सेवांचा फायदा शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना होत आहे, असे ते म्हणाले.

डॉ. राकेश गांधी यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या विविध सेवांची माहिती दिली. आतापर्यंत हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध आजारांवर शिबिरे घेण्यात आली असून, शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो एन्टेरॉलॉजिस्ट येथून प्रशिक्षण घेतलेले डॉ. वैभव अजमेरे हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन एन्डोस्कोपी युनिटमधून वैद्यकीय सेवा देणार आहेत.

नवजात अर्भक व बालरोग अतिदक्षता विभागात डॉ. महेश कवडे वैद्यकीय सुविधा देणार आहेत. डॉ. महेश कवडे यांनी जगजीवनराम रुग्णालयात प्रशिक्षण घेतले आहे, असे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा