सूर्योदय होऊनही चार तास अंधार!

रशियामध्ये एक अनोखी घटना घडली असून या रहस्यमय घटनेची संपूर्ण जगात चर्चा होत आहे. गेल्या शुक्रवारी तेथील एका भागात सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्यप्रकाश दिसत नव्हता. वास्तविक तिथे पहाटे चार वाजताच सूर्योदय झाला होता. सैबेरियाच्या वेरखोयस्क क्षेत्रातील लोकांना सूर्य उगवल्यानंतरही अनेक तास अंधाराचा सामना करावा लागला. सूर्योदयानंतर चार तास इटलीच्या आकाराच्या या परिसरात पूर्णपणे अंधार होता आणि तापमानही घटलेले होते.

‘सैबेरियन टाईम्स’ च्या अहवालानुसार उपआर्क्ट्रिक क्षेत्रातील या भागात हा अनोखा प्रकार पाहायला मिळाला. तेथील स्थानिक लोकांनी सांगितले की, अंधारात एक पिवळ्या रंगाची छटा दिसून येत होती. गेल्यावर्षी जुलैमध्ये या कुटियाच्या तीन विशाल क्षेत्रातही अशाच प्रकारची घटना घडलेली होती. वेरखोयस्क शहरातील एका रहिवाशाने सांगितले की, दरवर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये आम्ही जागे होतो त्यावेळी आज सूर्य उगवेल की नाही याची आम्हाला धास्ती असते! संशोधकांनी हा प्रकार वणव्यामुळे लागलेल्या धुराचाही परिणाम असू शकतो असे म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा