प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संपाची हाक

नगर- जुनी पेन्शन बचाव कृती समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने सोमवार 9 सप्टेंबर रोजी संपाची हाकदेण्यात आली असून, या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी तसेच अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याकारणाने व शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, शासकीय-निमशासकीय कर्मचारी व शिक्षक- शिक्षकेतर समन्वय समितीने 9 सप्टेंबरला महाराष्ट्रभर संपाची हाक दिली आहे.

या संपात सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राजाध्यक्ष वेणूनाथ कडू, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कार्याध्यक्ष आमदार ना. गो. गाणार, माजी आमदार भगवान साळुंखे, कोषाध्यक्ष किरण भावठणकर, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, कार्यालयीन मंत्री सुनील पंडित, संयोजक प्राचार्य चंद्रकांत चौगुले, पेन्शन बचाव समिती राज्य संयोजक संजय यवतकर, दिलीप रोकडे, विजय गरड, सय्यद शाहिदा, अनिता सरोदे, मेधा कुलकर्णी, शेख समिना, सुभाष ढेपे, बापू जगताप, म्हस्के सर, प्रशांत सुरशे, योगेश गुंड, चाबुकस्वार सर यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या व जुनी पेन्शन बचाव समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभाग अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित व जुनी पेन्शन बचाव समितीचे संयोजक प्राचार्य चंद्रकांत चौगुले, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सखाराम गारुडकर, शरद दळवी, गोविंद धर्माधिकारी यांनी आवाहन केले आहे.

जुनी पेन्शन बचाव समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेतरांनी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा