सिंह आणि माणसाचे पांडित्य

एक माणूस फिरत-फिरत मोठ्या अरण्यात येऊन पोहोचला. तेथे त्याला एक सिंह भेटला. तेव्हा ते दोघे गप्पा मारु लागले. निरनिराळ्या विषयांवर चर्चा करता-करता ते एकमेकांचे मित्र बनले. अखेर चर्चेअंती ‘माणूस श्रेष्ठ का सिंह श्रेष्ठ?’

यावर त्यांचा वाद रंगला. कोणीच कोणाला हार जाईना. नुसत्या बोलण्याने माणूस श्रेष्ठ, हे काही त्या माणसाला सिद्ध करता येईना. मग काय बरे करावे?

असा विचार करीत असता त्याला आपल्याजवळ असलेले कोरीव शिल्प आठवले. त्यासरशी ते त्याने सिंहाला दाखविले. त्या चित्रात एक माणूस सिंहाची आयाळ हातात धरुन त्यावर स्वार झालेला दिसत होता.

ते चित्र पाहून सिंह त्या माणसाला म्हणाला, ‘‘अरे हे चित्र ज्याने कोरले, तो माणूस होता. त्याच्या जागी जर सिंह चित्र कोरत असता, तर त्याने माणसाला खाली पाडून सिंह त्याच्या छातीवर पाय देऊन विजयी मुद्रेने पाहत आहे, असे दाखविले असते.’’

तात्पर्य – आपल्याला जे अनुकूल असेल, तीच उदाहरणे सांगून आपली बाजू पटवण्याचा प्रयत्न जो तो करतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा