गणेश मंडळाने ध्वनीक्षेपणाचा आवाज मर्यादित डेसिबलपेक्षा जास्त ठेवू नये-पो.नि.विकास वाघ

नगर- शहरात सुरु असलेल्या गणेशोत्सव कालावधित गणेश मंडळाने मंडळासमोर लावलेल्या सीडी, डॉल्बी, स्पीकर साऊंड सिस्टीम अशा ध्वनीक्षेपणाचा आवाज शासनाने नमुद केलेल्या डेसिबल पेक्षा जास्त ठेवू नये असे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी केले आहे. दि.2 ते 12 दरम्यान शहरात सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे.

या उत्सवात गणेश मंडळांनी स्पीकर लावण्याकरीता परवानगीचे अर्ज पोलिस ठाण्यात दाखल केलेले आहेत. मंडळाच्या या स्पीकर वापरामुळे होणारे ध्वनिप्रदुषण व त्याचा सदर परिसरातील नागरिकांना होणारा त्रास या पार्श्‍वभुमीवर डॉल्बी साऊंड सिस्टिमचा वापर सामाजिक सुरक्षिततेच्या व पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून योग्य नाही याकरिता पोलिस प्रशासनाच्यावतीने सर्वांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या सीडी, डॉल्बी, स्पीकर साऊंड सिस्टीम अशा ध्वनीक्षेपणाचा आवाज शासनाने नमुद केलेल्या डेसिबल पेक्षा जास्त ठेवू नये तसेच ध्वनीप्रदुषण नियम/नियंत्रण 2000 चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

शासनाने शहरातील परिसरात झोनप्रमाणे ध्वनीक्षेपणाच्या मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान ध्वनीक्षेपकाचा आवाज हा शांतता झोनमध्ये 50 डिसेबल हवा, निवासी झोनमध्ये 55 डिसेबल तसेच वाणिज्य झोनमध्ये 65 डिसेबल आणि औद्योगिक झोनम ध्ये 75 डेसिबल इतका असावा असे नमुद केले आहे. त्यापेक्षा जास्त डेसिबलमध्ये आवाज ठेवू नये. या कायद्याचा भंग केल्यास कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी म्हटले आह

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा