सोमनाथ कोठुळे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

अहमदनगर- नगर तालुक्यातील खडकी येथील सोमनाथ एकनाथ कोठुळे यांची नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. यापूर्वी त्यांनी इंडियन नेव्हीमध्ये आपली सेवा पूर्ण केली आहे.

त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खडकी येथे पूर्ण झाले. त्यानंतर रेसिडेन्सियल महाविद्यालयात 12 पर्यंत शिक्षण घेऊन ते इंडियन नेव्हीमध्ये रुजू झाले होते. त्या काळातच त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील सारोळा कासार शाखेचे शाखाधिकारी एकनाथ कोठुळे यांचे चिरंजीव आहेत. यांच्या या यशाबद्दल प्रवीण कोठुळे, बापूसाहेब कोठुळे, सुनील कोठुळे, शरद कोठुळे, बाबासाहेब कोठुळे, हरिभाऊ निकम, संजय बहिरट, पंढरीनाथ कोठुळे, अशोक निकम, भाऊसाहेब रोकडे, दीपक वाबळे यांनी अभिनंदन केले आहे. खडकी ग्रामपंचायत आणि तुळजा भवानी आजी-माजी सैनिक संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा