किरकोळ वादातून तरुणाची आत्महत्त्या

अहमदनगर- घरातील किरकोळ वादातून रागाच्या भरात 20 वर्षीय शुभम किशोर बनसोडे (मुळ रा.सलबतपुर, नेवासा, हल्ली रा.कोंडवढ, ता.राहुरी) याने मुळा नदीच्या पात्रात उडी मारुन आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी (दि.18) सकाळी निदर्शनास आली.

मृत शुभम हा त्याचे वडील वारल्यानंतर आई व बहिणीसह मामाच्या घरी कोंडवढ येथे शेजवळ यांच्या कुटुंबात रहात होता. तो राहुरी महाविद्यालयात बी.कॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. परीक्षेची फी भरण्यासाठी घरुन पैसे घेऊनही त्याने गणेशोत्सव काळात महाविद्यालयात न गेल्याने फी भरली नाही. दरम्यान फी भरण्याची मुदत संपल्याने त्याला दंडाच्या रकमेसह फी भरावी लागली. या कारणावरुन त्यांच्या घरामध्ये किरकोळ वाद झाला. त्या वादातून रागाच्या भरात शुभम हा सोमवारी (दि.16) रोजी घरातून निघून गेला होता. त्याच्या घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह मुळा नदीच्या पात्रात आढळून आला.

याबाबत पोलिस पाटील तागड यांनी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच तलाठी वर्षा कातोरे, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ जायभाय व आजिनाथ पारखी हे घटनास्थळी पोहोचले.

याप्रकरणी राहुरी पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास राहुरी पोलिस हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा