जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी शिवाजीराव जगताप

अहमदनगर- नगर जिल्हा कृषी कार्यालयाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी शिवाजीराव जगताप रुजू झाले आहेत. श्री. जगताप यांनी याअगोदर नगर येथे 2006-09 मध्ये उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून काम केले आहे. रत्नागिरी येथे ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर कार्यरत होते.

श्री. पंडित लोणारे हे नुकतेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर कृषी उपसंचालक विलास नलगे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. नुकतीच रत्नागिरी कृषी कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांची नगरला बदली झाली असून, ते रुजू झाले आहेत. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

याप्रसंगी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांनी श्री. जगताप यांच्याकडे पदभार सोपवून स्वागत केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, रामदास दरेकर, शिल्पा गांगर्डे, अशोक दहिफळे, श्रीमती सपकाळ, श्रीमती भारदे, जालिंदर गांगर्डे, शशिकांत जाधव, विनोद वाडेकर, प्रकाश खंडागळे, रवींद्र माळी, बाळासाहेब आठरे, संजय येरगुंटला, विजय सोमवंशी, संजय भगत, बाबा कचरे, ज्ञानेश्‍वर डुकरे, दत्तात्रय जावळे, ज्ञानेश्‍वर पादिरसह कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिवाजीराव जगताप म्हणाले की, मी याअगोदर नगरला उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला जिल्ह्याची बर्‍यापैकी माहिती आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करू. शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजना अधिक सक्षमपणे राबविले जातील. शेतकर्‍यांशी वेळोवेळी संवाद साधून काम करण्याची आपली पद्धत आहे. त्याचा काम करताना अधिक फायदा होतो. शेतकर्‍यांमध्ये मिळून मिसळून काम केल्यास कामाचा अधिक आनंद मिळतो, असे ते म्हणाले.

श्री. नलगे म्हणाले की, शिवाजीराव जगताप यांची वेगळी ओळख असून, त्यांनी याअगोदर 2006 ते 2009 या कालावधीत नगर जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असल्याने शेतकर्‍यांतील अधिकारी म्हणून ते ओळखले जातात, असे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा