शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी राज्य शिक्षक परिषदेचे आत्मक्लेश आंदोलन


सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घरोघरी आत्मक्लेश करुन शिक्षक आंदोलनात सहभागी

अहमदनगर – शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शहरासह जिल्ह्यात घरोघरी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. नालेगाव येथील एका निवासी अपार्टमेंटच्या बाहेर शिक्षकांनी एकत्र येऊन फिजीकल डिस्टीनसचे पालन करुन आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शिक्षक परिषदेचे प्रा.सुनिल पंडित, बाबासाहेब बोडखे, रंगनाथ लबडे, प्रा.विष्णू ससे, सखाराम गारूडकर, प्रा.सुनिल सुसरे, किशोर दळवी, प्रा.विलास साठे आदि उपस्थित होते.

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक परिषदेने महाराष्ट्रात दि.4 व 5 जून रोजी दोन दिवसीय आत्मक्लेश आंदोलनाची हाक दिली होती. यामध्ये शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक वर्षापासून शिक्षकांच्या मागण्या प्रलंबीत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सदरील प्रश्‍न सुटत नसल्याने शिक्षक घरामध्येच आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकड्यावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना दि.1 एप्रिल 2019 पासून 20 टक्के वेतन अनुदान व वाढीव वेतन देण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढून अनुदानास घोषित करावे, तातडीने त्यांचे अनुदान वितरित करावे, उच्च माध्यमिक शाळेतील सन 2003 ते 2019 या कालावधीत प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदाना शासन मान्यता प्रदान करून वेतन अनुदान वितरित करावे, टीईटीग्रस्त शिक्षकांचे जानेवारी 2020 पासून रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मोकळे करावे, अपंग समावेशीत शिक्षण योजना (माध्यमिक स्तर ) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचरिकांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करावे तसेच अन्यत्र समायोजन करावे, 8 हजार संगणक शिक्षक/निर्देशक यांना पूर्ववत सेवेत रुजू करावे, रात्र शाळेला पूर्ण शाळेचा दर्जा द्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्य वतीने करण्यात आली आहे.

या आंदोलनात शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदी शिक्षकांनी आपल्या घरी आत्मक्लेश आंदोलन करुन पाठिंबा दिला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा