सेवाज्येष्ठतेबाबत हरकती नोंदविण्यासाठी 15 जूनपर्यंत लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन

अहमदनगर- शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून, 23 जून पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने राज्य विभाग, जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांना 15 जून पर्यंत लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 8 जून 2020 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना प्रकाशित केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील अनुसुची फ (प्रवर्ग क) मध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे. प्रस्तावित सुधारणेचा मसुदा सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या प्रस्तावित मसुद्याच्या संबंधात हरकती किंवा सूचना अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे 23 जून पर्यंत सादर करण्याची कायदेशीर संधी देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रस्तावित मसुद्याच्या संबंधात शासनाला सूचना सादर करण्यासाठी अभ्यास गट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यास गटाच्या प्रमुख म्हणून शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा पांडुरंग चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य या अभ्यास गटाचे सदस्य असून पुणे कार्याध्यक्ष जितेंद्र पवार, अमरावती विभाग अध्यक्ष राजकुमार बोंनकिले, पेन्शन बचाव समितीचे संयोजक संजय येवतकर हे आमंत्रित सदस्य आहेत.

महाराष्ट्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना यांना प्रस्तावित मसुद्याबाबत सुचना लेखी स्वरुपात 15 जूनपर्यंत nagoganargmail.com या मेलवर किंवा योगेश बन 9823044403, रजना कावळे 7387075174 व सुभाष गौतमारे 7972129300 यांच्या व्हाट्सअप वर पाठवण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, सहकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी केले आहे. या सर्व सुचना एकत्रित करुन ते शासनास सादर केल्या जाणार आहेत.

नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त सूचना पाठविण्यासाठी शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल सर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदि प्रयत्नशील आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा