जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकदिनी 14 शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव

नगर- शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील 14 प्राथमिक शिक्षक व 2 केंद्रप्रमुखांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गुरुवारी (दि.5) दुपारी औरंगाबाद रोडवरील एनआर लॉन येथे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अर्थ व बांधकाम समिती सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याण समिती सभापती उमेश परहर, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अजय फटांगरे, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधाताई नागवडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) दिलीप थोरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने पुरस्कार देऊन गौरविलेल्या शिक्षकांमध्ये वैजिनाथ विलास धामणे (हराळमळा, राळेगण, ता.नगर), रामनाथ वाकचौरे (विरगाव, ता.अकोले), ज्ञानेश्‍वर फटांगरे (सारोळे पठार, ता.संगमनेर), ज्ञानेश्वर सौंदाणे (शहापूर, ता.कोपरगाव), शिवाजी गायकवाड (नांदुर्खी ता.राहाता), राजेंद्र पंडित (दत्तनगर, ता.श्रीरामपूर), विजय कदम (कोंढवड, ता.राहुरी), मनिषा लबडे (दत्तवाडी, ता.नेवासे), रोहिणी साबळे (भायेगाव, ता.शेवगाव), शैलेश डमाळ (मढी, ता.पाथर्डी), काकासाहेब कुमटकर (बर्‍हाणपुर, ता.जामखेड), छाया मुन्ने (मिरजगाव, ता.कर्जत), ताईबाई पवार (शेंडगेवाडी, ता.श्रीगोंदे), बाळु शिंगोटे (रोकडेवस्ती, ता.पारनेर) तसेच केंद्रप्रमुख अशोक घाडगे (शिंगवे तुकाई, ता.नेवासा), आशा फणसे (जेऊर, ता.नगर) यांचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा