शेअर बाजारातील ‘मंदी – संधी’

२०२० च्या सुरवातीला भारतीय शेयर बाजारांमध्ये तेजीचे घोडे धावत होते. २०१९ मधील जोरदार मानसून असो किंवा लोकसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपाला मिळालेले बहुमत असो, ह्या फॅक्टर्स मुळे ‘एफ.डी.आय’ आणि ‘डी.आय.आय’च्या गुंतवणुकीचा ओघ तेजीला पूरक ठरत होता. पण तेवढ्यात चीनच्या वुहान मधून सुरू झालेल्या कोरोनाने असा काही कहर केलाय अन जागतिक शेयर बाजारांमध्ये जणू हाहाकार माजली..

२० जानेवारीच्या आसपास सेन्सेक्सने ऐतिहासिक अशी ४२००० ची पातळी ओलांडली आणि लगेच जगभरातून कोरोनाच्या बातम्या येऊ लागल्या, बघता बघता अवघ्या २ महिन्याच्या काळात सेन्सेक्स गडगडून २६००० च्याही खाली गेला, तब्बल १६००० अंशांची म्हणजेच अंदाजे ४०% घसरण झाली. आपण अशी घसरण २००८ मध्ये सुदधा अनुभवली आहे आणि मोठ्या मंदीतून शेयर बाजार बाहेर पडून तेजीचे नव नवीन शिखरे कसे गाठतात हे सुद्धा अंनुभवलयं.

मित्रांनो शेयर बाजाराचे निर्देशांक हे ‘लालच आणि भय’ तसेच ‘आशा आणि नैराश्य’ यांचे मापदंड असते असे म्हणायला काहीही हरकत नाही. त्यामुळे भय तसेच नैराश्यामुळे जवळपास ४०% घसरलेला निर्देशांक पुन्हा भरारी घेइलच या आशे वर नवीन गुंतवणूक करायला काही हरकत नाही.

मंदीमध्ये संधी साधता आली पाहिजे आणि त्यासाठी मी एक सप्तपदी आपल्याला काही मार्गदर्शक मापदंडांसह गुंतवणुकीसाठी पुढीलप्रमाणे पर्याय सुचवत आहे.

  • पिडिलाईट इंडस्ट्रीज – जगातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये ह्याचे प्रोडक्ट्स विकले जातात. ह्याचा लाईफ टाइम हाय 1710 हा नुकताच गाठला गेला आणि आता सध्या तो भाव 1470 च्या जवळ आहे. आपण हा शेयर लॉंग टर्म गुंतवणूक म्हणून 1250 च्या रेंज मध्ये आल्यावर खरेदी करायला हरकत नाही.
  • एच.डी.एफ.सी. बँक – सध्याच्या मंदीचा परिणाम बँकांवर होणार असला तरी यांसारख्या ग्राहकांची ‘पारख’ असलेल्या बँकेत गुंतवणूक करायला हरकत नाही. ह्याचा लाईफ टाइम हाय 1305 असून सध्या 850 च्या जवळ आहे. आपण हा शेयर लॉंग टर्म गुंतवणूक म्हणून 750 च्या रेंज मध्ये आल्यावर खरेदी करायला हरकत नाही.
  • टीसीएस – जगातील अग्रगण्य सॉफ्टवेयर कंपन्यांपैकी एक.अनेक देशांमध्ये आपल्या कामकाजाचा कंपनीने ठसा उंमटवलेला आहे.मंदीतून बाहेर पडत असताना जगभरात सॉफ्टवेअर्सचा बोलबाला राहणार यात तीळमात्र शंका नाही अश्यात टीसीएस सारखा उत्तम पर्याय मिळणे कठीण आहे.ह्याचा लाईफ टाइम हाय 2300 असून सध्या तो भाव 1730 च्या जवळ आहे.आपण हा शेयर लॉंग टर्म गुंतवणूक म्हणून 1600 च्या रेंज मध्ये आल्यावर खरेदी करायला हरकत नाही.
  • बजाज फायनान्स – रिटेल फायनान्स मध्ये सर्वात कमी वेळेत प्रगती करणारी कंपनी. मोबाइल, टीव्ही, फ्रीज, पर्सनल लोन अश्या जोखीम असलेल्या क्षेत्रात कर्ज वितरण करत आपली पाळेमुळे कंपनीने बाजारात खोलवर रोवली आहेत. ह्याचा लाईफ टाइम हाय 4923 असून सध्या तो भाव 2150 च्या जवळ आहे.आपण हा शेयर लॉंग टर्म गुंतवणूक म्हणून 2000-2050 च्या रेंज मध्ये आल्यावर खरेदी करायला हरकत नाही.
  • फोर्समोटर्स – प्रवासी वहातूक करणारी प्रसिद्ध गाडी टेम्पो ट्रेव्हलर हे ह्याच कंपनीचं प्रोडक्ट. प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये प्रख्यात ब्रॅंड याशिवाय स्पर्धा करायाला जवळ पास कोणीही स्पर्धकही नाही. ह्याचा लाईफ टाइम हाय 4840 असून सध्या ह्याचा भाव 760 च्या जवळ आहे. आपण हा शेयर लॉंग टर्म गुंतवणूक म्हणून 650-675 च्या रेंज मध्ये आल्यावर खरेदी करायला हरकत नाही.
  • टाटा स्टील – जवळच्या काळातील हाय पासून निम्यापेक्षा कमी दरात मिळणारा हा शेयर विख्यात टाटा ग्रुपच्या ब्रॅंडवॅल्यू कडे आकर्षित करतो. स्टील क्षेत्रातील गुंतवणूकचा पर्याय म्हणून सर्वात पुढे असतो. ह्याचा जवळच्या काळातील हाय 740 असून सध्या तो भाव 280 च्या जवळ आहे. आपण हा शेयर लॉंग टर्म गुंतवणूक म्हणून 220-240 च्या रेंज मध्ये आल्यावर खरेदी करायला हरकत नाही.
  • सन फार्मा – मेडिसीन जगतातील भरीव काम करणारी प्रसिद्ध औषध कंपनी. शिवाय व्हायरल मेडिसीन क्षेत्रात रिसर्च अँड डेव्हलपमेट करणारी पहिल्या 4/5 पैकी एक कंपनी. ह्याचा लाईफ टाइम हाय 1200 असून सध्या तो भाव 450 च्या जवळ आहे. आपण हा शेयर लॉंग टर्म गुंतवणूक म्हणून 375-400 च्या रेंज मध्ये आल्यावर खरेदी करायला हरकत नाही.

ह्या सप्तपदी मध्ये गुंतवणूक करताना आपल्या आपल्या आर्थिक क्षमतेनुसार किंवा त्याही पेक्षा कमी प्रमाणात इन्वेस्मेंट करा. अधिक जोखीम आपले आर्थिक गणित उध्वस्त करू शकते. मी आपणास रिकमेंड करत असलेल्या पर्यायांना स्टॉप लॉस जाणीवपूर्वक दिलेला नाही कारण कोरोना सारख्या महामारीमुळे बसणार्‍या तडाख्याचा अंदाज आपण लाउच शकत नाही, त्यामुळे शेयर बाजार किती तळ गाठेल याचा अभ्यास करणे अशक्यप्राय आहे.

मित्रांनो कोरोना रुपाने जगावर आलेले संकट न भूतो न भविष्यती अशी हानी करून जाईल असे जानकार सांगत आहेत अशाही परिस्थितीत नव्याने गुंतवणुकीच्या संधी शोधत असाल तर हा लेखा जोखा नक्कीच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल. सध्या सुरू असलेल्या ह्या उलथापालथीच्या पलीकडे एक आशेचा किरण चकाकतोय, आजकाल शास्त्रीय संशोधन यंत्र तंत्राच्या सहाय्याने जलद आणि अचूक होत आहे. हे नव्याने सांगायची गरजच नाही आणि कोरोना वर अनेक कंपन्या, शास्त्रज्ञ, जैविक सोग निवारण समित्या अहोरात्र संशोधन करत आहेत आणि लवकरच त्यांना यश प्राप्ती होईल अशी आशा आहे.

लेखक – शैलेश गांधी, अहमदनगर (शेअर्स & कमोडिटी ब्रोकर) संपर्क – 9422088510

टीप – शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही एक मोठी जोखीम असल्याने संपूर्ण अभ्यास असल्या शिवाय गुंतवणूक करू नये. आपल्याला दिलेल्या सर्व गुंतवणूक पर्यायांतील नफा-नुकसानीशी लेखकाचा काही एक संबंध असणार नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा