शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्यास 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहन

विनाअनुदानित शाळा कृती समितीचा इशारा

अहमदनगर- विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय याला अनुदान मिळणेसाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या दालनांमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेल्या वीस वर्षापासून या शिक्षकांना कोणत्याही पद्धतीचे अनुदान शासनाच्यावतीने देण्यात आले नाही. वारंवार शिक्षणाधिकारी व शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविण्यात आल्यानंतरही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही म्हणून शिक्षण अधिकारी यांच्या दालनांमध्ये शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शिक्षकांनी शिक्षण अधिकारी यांच्या दालनात आंदोलन करीत असताना त्यांनी शासनाला 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. 15 ऑगस्टपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयासमोर सर्व शिक्षक सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदनाद्वारे शिक्षण अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

यावेळी पालवे सचिन, उमादेवी शेळके, मीना गोरडे, संजय शेवाळे, शीतल निमसे, नानासाहेब बांदल, नितीन साळवे, सावन गतकल, श्रीकांत जाधव, प्रमोद घोडेचोर, भागवत गुंजाळ, बाळासाहेब साळवे, नितीन बुरडे, दिलीप भास्कर, गायकवाड, शेखर अंधारे, हरवणे बाबासाहेब, सुभाष चिंधे आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा