सावेडी भागातील अग्निशमन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – सौ. वीणाताई बोज्जा

अहमदनगर – नुकतेच प्रेमदान चौकातील स्वीट होम या हॉटेलला आग लागली असता संबंधित मालकांनी सावेडी अग्निशामक कार्यालयात फोन केला असता कोणीही फोन उचलला नाही व संबंधित कार्यालय बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक ही बाब गंभीर असून त्वरित संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांनी प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी, अहमदनगर व आयुक्त मनपा, अहमदनगर यांच्याकडे केली आहे.

वास्तविक पाहता अग्निशमन विभाग हे अतिदक्ष व महत्वाचे विभाग आहे. मनपाने मोठया प्रमाणात लोकसंख्या असल्याने सावेडी भागासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. सदरचे कक्ष स्थापन करणे मागे हाच उद्देश होता की या भागात त्वरित सेवा देण्यात यावी. सदरचे कार्यालय हे किती दिवसा पासून बंद आहे, या कक्षातील अधिकारी व कर्मचारी सध्या काय काम करतात, जर हे अधिकारी व कर्मचारी या कक्षासाठीच नेमलेले असतील तर ते बेजबाबदार पणे का वागले त्याच्या या कृत्यामुळे जर कोणतीही जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कॊण असे अनेक प्रश्न उदभवत आहेत. सदरील बाब ही गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, असे सौ. वीणाताई बोज्जा यांनी सांगितले.

‘अग्निशमन’ हे अत्यावश्यक कक्ष असल्याने संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सावेडी भागातील अग्निशमन कक्ष संपूर्ण अत्यावश्यक सेवेसह पूर्ववत करा, अशी मागणी सौ. वीणाताई बोज्जा यांनी केली आहे.

सौ. वीणाताई बोज्जा, माजी नगरसेविका

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा