जीवनात शिस्तीचे पालन करुन दिनचर्या आखावी – गणेश शिंदे 

श्रीसंत सेना प्रतिष्ठान व खान्देश नाभिक युवा मंचतर्फे व्याख्यान

अहमदनगर – समाजाने जीवनात शिस्तीचे पालन करून दिनचर्या आखावी. आपल्यासह संपूर्ण कुटुंबाला शिस्तीसह आहार-विहाराकडे लक्ष देण्यास सांगितले पाहिजे. सध्या टीव्ही, मोबाईलमुळे एकाच जागी बसून व्हॉटस् अॅप पाहणे, चॅटींग करणे यांची जादा क्रेझ आली आहे. अति झाल्यास हे सर्व घातक ठरणारे असून याबाबत दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पुरुषांनी आपल्या घरातील महिला-मुले यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पुरुषवर्ग पैसे कमावून आणून देतो, पण घरातील महिला सर्व कुटुंबाचे योग्य नियोजन करून कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालविते. त्या अर्थाने तिला उत्तम व्यवस्थापकाची पदवी दिल्यास वावगे होणार नाही, असे गणेश शिंदे यांनी सांगितले.

श्रीसंत सेना प्रतिष्ठान व खान्देश नाभिक युवा मंचने श्रीसंतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त श्रीसंतसेना महाराजांना अभिवादन केले. यानिमित्त पुणे येथील प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे यांचे ‘जीवन सुंदर आहे’ विषयावर व्याख्यान झाले. यावेळी शेकडो उपस्थित श्रोत्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

कार्यक्रमात श्रीसंत सेना प्रतिष्ठान व खान्देश नाभिक युवा मंचचे अध्यक्ष रामदास आहेर, नगरसेविका सौ. शितल जगताप, नगरसेविका सौ. शोभाताई सुधाकर बोरकर, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचने तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बाळासाहेब भुजबळ, बारा बलुतेदार संघाचे माऊली गायकवाड, महिला विश्‍वस्त सौ. रोहिणी हिरे, सौ. सुलभा सटाणकर, चंद्रकांत आहेर, युवा अध्यक्ष ज्ञानेश्‍वर निकम, नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष विशाल सैंदाणे, श्रीमती शबनम गांगुर्डे यांच्या हस्ते विविध स्पर्धांत नैपुण्य प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

रामदास आहेर यावेळी म्हणाले, श्रीसंत सेना प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर गेल्या 5 ते 6 वर्षांपासून संघटनेने सर्वांच्या सहकार्याने चांगले बाळसे धरले आहे. ज्यांनी अद्याप सदस्यत्व घेतले नसेल त्यांनी ते त्वरित घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री राजेंद्र सोन्नीस, आबा हिरे, कैलास आहेर, सुधीर आहेर, प्रसाद सैंदाणे, प्रकाश वाघ, शाम विश्‍वास, आशिष सैंदाणे, जीवन सोन्नीस, शरद आहेर, सौरभ सैंदाणे, अनिल निकम, सतीश सैंदाणे, संजय खोंडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

सूर्यकांत सैंदाणे आणि केतन आहेर यांनी सूत्रसंचालन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा