रोटरी क्लब प्रियदर्शनीतर्फे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मान

अहमदनगर – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्यावतीने साक्षरता दिन साजरा करण्यात आला. रोटरीच्या साक्षरता माहचा शुभारंभ शहरातील शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करुन करण्यात आला.

रोटरी क्लबच्यावतीने दरवर्षी सप्टेंबर महिना साक्षरता माह म्हणून साजरा केला जातो. या उपक्रमातंर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मालती गोरे, रोटरीच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सचिव नंदिनी जग्गी, माजी अध्यक्षा सुशिला मोडक, मालती गोरे, डॉ. बिंदू शिरसाठ, कुंदा हळबे उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन सर्वसामान्य घटकातील मुलांना घडविणारे शिक्षक रवी चांदेकर, विठ्ठलप्रसाद तिवारी, वैशाली दार्वेकर, भरतकुमार भालसिंग, शरद तनपुरे, भालचंद्र जगनाडे, जयाभारती क्षीरसागर, योगेश हराळे, युवराज गारुडकर यांना नेशन बिल्डर अवॉर्डने उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच मालती गोरे यांना सामाजिक कार्याबद्दल रोटरी व्होकेशनल सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्डने गौरविण्यात आले.

जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सशक्त राष्ट्र निर्माणाचे कार्य शिक्षक करीत आहे. विद्यार्थ्यांच्या रुपाने उद्याचे उज्वल भविष्य शिक्षकांच्या हातून घडत आहे. शिक्षकांचे ऋण न फेडता येणारे असून, शिक्षक हा राष्ट्राचा पाया मजबूत करणारा घटक असल्याचे त्यांनी सांगितले. नंदिनी जग्गी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

साक्षरता माहच्या प्रमुख सुशीला मोडक यांनी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रोटरीच्यावतीने राबविण्यात येणार्‍या उपक्रमाचा आराखडा सादर केला.

कुंदा हळबे, गीता गिल्डा व बिंदू शिरसाठ यांनी नाटकातून रोटरीच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. रोटरी क्लबच्यावतीने संजय नगर येथील बालभवनच्या 25 उत्कृष्ट खेळाडूंना खेळाचे साहित्य व गणवेश आदी साहित्याचा समावेश असलेल्या किटचे वाटप डॉ. एस.के. हळबे यांच्या स्मरणार्थ हळबे कुटुंबीयांतर्फे करण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा