स्क्रु ड्रायव्हरचा धाक दाखवुन वृध्देस लुटले

अहमदनगर – प्रवासी म्हणुन कारमध्ये बसवलेल्या 60 वर्षीय वृध्द महिलेस स्कु्र ड्रायव्हरचा धाक दाखवुन तिच्याकडील 40 हजार रूपयांची दागिने बळजबरीने चोरून नेल्याची घटना केडगाव बायपास शिवारातील सत्कार मंगल कार्यालयाच्यामागे बुधवारी (दि.14) सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली.

हसीना दाऊद शेख (वय 60, रा. मोहिनीनगर, केडगाव) या अंबिकानगर केडगाव येथील बस स्टॉप वरून कोंढापुरी (ता. शिरूर) येथे जाण्यासाठी एका पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बसला. कारमध्ये एक महिलाही बसलेली होती. त्यानंतर कार केडगाव बायपास शिवारातील सत्कार मंगल कार्यालयाच्या मागे काही अंतरावर गेल्यावर कारचालकाने कार रोडच्या कडेला साधारण 1 कि.मी. अंतरावर नेवून थांबविली व गाडीच्या खाली उतरून हसीना शेख यांना स्क्रु ड्रायव्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील 40 हजार रूपयांची दागिने बळजबरीने काढून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी हसीना शेख यांच्या फिर्यादीवरून भादंविक 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास स.पो. नि. केदार हे करीत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा