कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्‍या दोघांना अटक

अहमदनगर – मोटारसायकलस्वारास अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन 20 हजार 500 रूपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. ही कारवाई गुरूवारी (दि.12) श्रीरामपुर येथे केली.

दशरथ नामदेव उपळकर (रा. श्रीरामपुर) हे त्यांच्या पत्नी व मुलांसह मोटारसायकलवरून जात असताना खौरी शिवारातील वीस चारी जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मोटारसायकल अडवुन त्यांना कोयत्याचा धाक दाखवुन मंगळसुत्र व रोकड बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी श्रीरामपुर पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.

या गुन्ह्याचा तपास करीत असता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अमोल दिलीप फोपसे (वय 19 वर्षे, रा. गोंडेगाव, श्रीरामपुर) यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार अक्षय संजय गोसावी (वय 22, रा. संजयनगर, श्रीरामपुर) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अक्षय गोसावी यास संजयनगर येथुन अटक केली. त्याच्याकडुन चोरीचे 20 हजार 500 रूपये, मंगळसुत्र जप्त केले. अटक आरोपींनी अधिक तपासकामी श्रीरामपुर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार सोन्याबापु नानेकर, हे.कॉ. मनोज गोसावी, पो.ना. शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, आण्णा पवार, अशोक गायकवाड यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा