कर्तृत्व बजावणीचे जाणीव करून देणारे रक्षाबंधन – एस. पी. सिंग

अहमदनगर- सैनिक कधीही स्वतःची चिंता करीत नाही. सदैव सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करीत असतो. छातीवर गोळ्या झेलत असतो. तो कधीही उन, वारा याची तमा बाळगत नाही. तुमच्यासारख्या आई भगिनींचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे हा भारत देश सुरक्षित ठेवण्यासाठी हा जवान कायम तयार असतो. रक्षाबंधनासारखे सण हे जवानांना त्यांच्या कर्तव्य बजावणीची जाणीव करून देतात, असे प्रतिपादन बेसिक ट्रेनिंग रेजिमेंटचे रिसदार मेजर एस. पी. सिंग यांनी केले.

प्रयत्न फाउंडेशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड सोशल वेल्फेअर व प्रयत्न नर्सिंग कॉलेजच्यावतीने रक्षाबंधननिमित्त बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट येथे रक्षाबंधननिमित्त जवानांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी ट्रेनिंग सेंटरचे रिसदार मेजर एस. पी. सिंग, सुजितकुमार, कॉलेजचे अध्यक्ष डॉ. विक्रम म्हस्के, डायरेक्टर डॉ. शीतल म्हस्के, प्रिन्सिपल माधुरी मकासरे, अॅडमिन मीना लाड, टीडीएम संदीपकुमार, सवार अतिमेश कुमार, भूपसिंग, दफेदार बिश्‍वनाथ, एएलडी हरिश भांबरे, गौरव बोरगे, सौरभ शिंदे, प्राजक्ता सोनवणे, जयश्री भाकरे, अस्मिता तडके आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

श्री. सिंग पुढे म्हणाले की, सैनिक हा नेहमी मानव धर्म पाळत असतो. शांतीचा संदेश जगाला देण्याचे काम तो करीत असतो. लढणे हा आमचा बाणा आहे. वतन संरक्षण करणे हा आमचा अभिमान आहे. समाजामधील अनेकांचे आशीर्वाद आम्हाला लढण्याची ताकद देतात. रक्षाबंधनाचे सण हे अखंड प्रेमाचा आणि अतुट विश्‍वासाचे नाते आहे. फौजी जवान हे मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर सुसज्ज राहण्यासाठी, तसेच कर्तव्य बजावणीसाठी तयार असतात, असे ते म्हणाले.

यावेळी कॉलेजच्या डायरेक्टर शीतल म्हस्के म्हणाल्या की, प्रयत्न फाउंडेशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड सोशल वेल्फेअर व प्रयत्न नर्सिंग कॉलेजच्यावतीने विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधल्या. यावेळी अनेकांना गहिवरून आले होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून काम करीत असलेले हे जवान असून, त्यांना त्यांच्या बहिणीची आठवण या निमित्ताने झाली. त्यांच्या बहिणी बनून विद्यार्थिनींनी राख्या बांधून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला, असे त्या म्हणाल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा