जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबईचे गजानन शेपाळे यांची प्रगतकलाला भेट

अहमदनगर- सर जेजे स्कूल ऑफ आर्टचे उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) विभागाचे वरिष्ठ अधिव्याख्याता व कलाविषयक स्तंभलेखक गजानन शेवाळे सर यांनी नगरमधील प्रगतकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी भेट दिली व विविध विषयावर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी ते म्हणाले, शहरात शिकणारे विद्यार्थी सृजनशील असतात असे नाही तर सुजनशीलता व विविध कला अंगी असणारा विद्यार्थी खरा गावाकडचा असतो व तोच कलचे उच्च शिक्षण घेण्यासाठी शहराकडे वळतो. असा खुलासा करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास पेरला व त्यांच्या विविध प्रश्नांना गप्पा स्वरुपात उत्तर दिली.

विद्यार्थ्यांच्या कलात्मक विकासासाठी रेखांकन रोज करणे खूप गरजेचे आहे प्रत्येक विद्यार्थ्यांने दिवसभरच्या उत्सहासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे व कलेत कष्ट करण्यात सातत्य ठेवणे हेच महत्त्वाचे आहे अनिमेशन व उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) या कलेच्या क्षेत्रात खूप संधी आहेत व त्या संदर्भात त्यांनी उदाहरणासह मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य नुरील भोसले, संजय काळे सर, महावीर सोनटक्के सर, प्रणव सापा सर उपस्थित होते तर नाशिक डायोसेस कौन्सिलचे सचिव विनायक पंडित, डॉ. जॉन प्रभाकर, बेसिल काळसेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

सर्व विद्यार्थ्यांना या चर्चासत्राचा व कलाविषयक मार्गदर्शनाचा खूप फायदा भविष्यात होईल अशी माहिती प्राचार्य नूरील भोसले यांनी दिली व गजानन शेवाळे यांचा सत्कार केला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा