जपान फाऊंडेशन आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत नगरचे प्रदीप गांधी यांना पारितोषिक

अहमदनगर – भारत व जपानमध्ये आपुलकी वृध्दिंगत व्हावी, सांस्कृतिक आदानप्रदान व्हावे यासाठी नवी दिल्लीस्थित जपानी दूतावास आणि जपान फाऊंडेशनच्यावतीने भारतीय पर्यटकांसाठी आयोजित केलेल्या जपान फोटो कॉन्टेस्ट 2019 मध्ये नगरच्या कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीप गांधी यांच्या छायाचित्रास चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. जपानला भेट देणा-या भारतीयांसाठी आयोजित या स्पर्धेत 505 फोटो सादर करण्यात आले. यात पहिल्या दहा क्रमांकाच्या उत्कृष्ट फोटोसाठी संबंधित विजेत्यांना नुकतेच जपान दूतावासात सन्मानित करण्यात आले.

फोटोग्राफीचा छंद असलेल्या प्रदीप गांधी यांनी जपानमधील भेटीत तेथील सौंदर्यस्थळे, पर्यटनस्थळे व एकूणच जपानी जीवनशैली आपल्या कॅमेर्‍यात टिपत वैशिष्ट्यपूर्ण फोटो काढले होते. या फोटोंचे खास प्रदर्शनही जपान दूतावासात लावण्यात आले.

नवी दिल्लीतील जपान दूतावासात झालेल्या या सन्मान कार्यक्रमावेळी जपानचे राजदूत केमजी हिरामत्सू, डीसीएम अॅण्डो, जपान फाऊंडेशनचे डायरेक्टर जनरल मियामोटो, कॅनॉन इंडियाचे सीईओ कझुतादा कोबायाशी, युसुके यामामोटो आदी उपस्थित होते. भारतीय पर्यटकांना जपानमध्ये आकर्षित करण्यासाठी तसेच एकूणच भारतीयांशी संवाद वाढावा यासाठी जपानतर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. याअंतर्गत झालेल्या या फोटो स्पर्धेसाठी कॅनॉन इंडिया व जपान नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशनने विशेष सहकार्य केले.

जपानमधील अनुभवाबाबत बोलताना प्रदीप गांधी यांनी सांगितले की, उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपानची जगभरात ओळख आहे. विज्ञान तंत्रज्ञानात जपानने केलेली नेत्रदीपक प्रगती डोळे दीपवणारी आहे. जगातील प्रगत राष्ट्रांपैकी एक असलेल्या जपानची संस्कृती, तेथील वर्क कल्चर अनोखे असून ते आपल्याला जवळून अनुभवता आले. जपानमधील भ्रमंतीत कॅमेर्‍यात तेथील वैशिष्ट्य टिपले व स्पर्धेसाठी पाठवले.

या फोटोसाठी पारितोषिक मिळाल्याचा आनंद वाटतो. सुरुवातीपासूनच फोटोग्राफीचा छंद मी जोपासलेला असून पर्यटनासाठी बाहेर गेल्यावर आवर्जून कॅमेरा सोबत नेत असतो. जपानमधील पर्यटनाचा आनंद फोटोग्राफीमधील पारितोषिकाने आणखी व्दिगुणित झाल्याची प्रतिक्रिया गांधी यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा