गौरी-गणपती सजावट स्पर्धेत नगरची कन्या सौ.प्राची रावळ प्रथम

अहमदनगर- अखिल भारतीय रावळ समाज महासंघाच्या गौरीगणपती सजावट राज्यस्तरीय स्पर्धेत नगरची कन्या सौ.प्राची अश्‍विन रावळ यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. सौ.प्राची रावळ या इस्लामपूर, ता.वाळवा, (सांगली) येथील रहिवासी आहे. तर त्यांचे माहेर अहमदनगर आहे.

सौ.प्राची रावळ यांनी गौरी गणपतीची पारंपारिक पूजा आणि सजावटी बरोबर त्यासमोर ‘सांगली-कोल्हापूर’ जिल्ह्यातील पुरपरिस्थिती दर्शवणारी सजावट केली होती. या सजावटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

समाजाच्यावतीने प्रथमच ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. समाजातील महिला भगिनींच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी हा उपक्रम होता. राज्यातून 83 स्पर्धकांनी यात भाग घेतला. परिक्षक पदाधिकार्‍यांनी शक्य तेथे प्रत्यक्ष तर उर्वरित ठिकाणी मेल, व्हॉटस्अप वर परिक्षण केले. या स्पर्धेमुळे राज्यातील घरा-घरात संपर्क झाला. आरास (सजावट) 10 गुण, सामाजिक संदेश 10 गुण, मांडणी 10 गुण असे एकूण 30 गुण होते. परितोषिक प्राप्त विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेचा निकाल असा प्रथम – सौ.प्राची रावळ (सांगली), द्वितीय – सौ.सुनंदा रावळ (माजलगांव, बीड), तृतीय -सौ.लता रावळ (उंब्रज, सातारा), चौथा – सौ. रीना कदम (वसमत, हिंगोली), पाचवा – सौ. धनश्री पराडकर (पिंपळेगुरव, पुणे). विजयी झालेल्या सर्व महिलांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विजेत्यापैकी सौ.प्राची रावळ या नगर काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची कन्या आहे. एसएनडीटी कॉलेज (लालटाकी) मध्ये त्यांनी फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण घेतले आहे तर कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये त्या अध्यापक आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा