‘सीना’वरील नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम निकृष्ट दर्जाच

नगरसेवक व नागरिकांनी वेधले आयुक्तांचे लक्ष

नगर- रेल्सेस्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सीनानदीवरील लोखंडी पुलाशेजारील नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असून अल्पावधितच हा रस्ता पुन्हा खचला जाण्याची शक्यता आहे. याबाबत या भागातील नगरसेवक व नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांचे लक्ष वेधत काम दर्जेदार करण्याच्या सुचना देण्याची मागणी केली. सीनानदीवरील नवीन पुलाचे काम पुर्ण झाले असून या पुलाला दोन्ही बाजूने जोडणार्‍या जोडरस्त्याची कामे सध्या सुरु आहेत. ती निकृष्ट दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक अनिल शिंदे यांनी आयुक्तांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शनिवारी (दि.7) दुपारी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त प्रदीप पठारे, अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे, अभियंता श्रीकांत निंबाळकर आदींनी या ठिकाणी जावून पाहणी केली. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, दत्ता जाधव, गणेश कंदूर, अशोक साळुंके, दादासाहेब अकोलकर, विजय गाडीलकर, सुर्यकांत जाधव, के.डी.खानदेशे, महेश रपारीया, संजय जायभाय यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी जोडरस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे, शेजारी असलेल्या स्मशानभुमी जाण्यासाठी रस्ता करुन द्यावा, दोन वर्षांपासून पुलाजवळच असलेल्या विद्युत रोहित्राचे स्थलांतर रखलेले आहे ते तातडीने करण्यता यावे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पुलावरून घेण्यात यावी अशा मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या. आयुक्तांनी याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्‍वासन दिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा