मराठा सायकल सेंटर नवदालनाचा 9 सप्टेंबर रोजी शुभारंभ

नगर – बाबागार्ड असो वा नव्या जमान्याची बॅटरीवरील बाईक-नगरकरांना सर्वप्रथम आठवते ते माणिक चौकातील मराठा सायकल सेंटर. 9 सप्टेंबर रोजी सायं 6 वाजता मराठा सायकल सेंटरच्या अद्ययावत नवीन शोरुमचा शुभारंभ होत आहे. 1969 मध्ये बीजरुपी 10 बाय 10 च्या छोट्याशा अंकुराने 50 वर्षानंतर डेरेदार वटवृक्षात घेतलेले मोठे रुप आनंद व समाधान देते याची सार्थकता अशोककुमार प्रभुदास भागवानी यांनी व्यक्त केली.

या सुवर्णमहोत्सवी वर्षात आमची तिसरी पिढी सर्वोत्तम ग्राहकसेवा देण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले. प्रारंभी तेलीखुंट येथे महाराष्ट्र सायकल नावाने कार्यान्वित या व्यवसायास रजतमहोत्सवी वर्षात त्यांची मुले गोपाल व प्रितम यांनी व्यापक स्वरुप दिले. येथे लहानांपासून मोठ्यांसाठीच्या सर्व प्रकारच्या सायकल्स, ट्रेक बायसिकल्स, ट्रायसिकल्स उपलब्ध आहेत. ग्राहक सायकल्स म्हटले की विश्‍वासाने येथे येतात असे गोपाल भागवानी म्हणाले.

काळ वेळप्रमाणे गरजा व मागणी बदलत जातात.आताची पिढी खेळ, फिटनेस व उच्च राहणीमान यासाठी लक्ष देतात. याचे भान ठेवून मनमाड रोडच्या मुख्य हमरस्त्यालगत या नवीन दालनाचा शुभारंभ करीत आहोत असे प्रितम भागवानी यांनी सांगितले. या नव्या दालनात त्यांची तिसरी पिढी पियुष व जितेन काम पाहणार आहेत. या नवीन दालनात सर्व प्रकारच्या सायकल्स, स्पोर्टस् मटेरियल्स, जिम इक्विपमेंटस् उपलब्ध आहेत. क्रॉस बाईक्स, सर्व प्रकारच्या खेळांचे शूज, ऍक्सेसरीज, एरोफिट हेल्थ इक्विपमेंटस्, सर्व नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार तसेच व्यायामाच्या सायकली, स्पेअर पार्टस् नानाविध प्रकारात पहावयास मिळतील. पुणे-मुंबईच्या धर्तीवरील या भव्य दालनाने शहराच्या वैभवात मोठी भर पडणार असून नगरकरांनी याला एकवेळ अवश्य भेट द्यावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा