किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत शिक्षक दिन उत्साहात

नगर- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या किशोर संस्कृत संवर्धिनी प्राथमिक शाळेत राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त माता पालक संघ व शिक्षक पालक संघाच्यावतीने सर्व शिक्षकांचा भेटवस्तू व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. पालक प्रतिनिधी लाड म्हणाले की, शालेय दशेत मिळणारे ज्ञान व संस्कार हे प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देतात.

आपल्या संस्कृतीत गुरुला मातापित्याप्रमाणेच दर्जा दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षकांचा व त्यांच्या शिकवणुकीचा कायम आदर बाळगावा. शिक्षक प्रतिनिधी मुकुंद पालवे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करीत बोधप्रद कथा सांगितली. शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता गोत्राळ यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनचरित्र उलगडून सांगत शिक्षक दिनाच्या सन्मानाबद्दल पालक व शिक्षकांचे आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा