पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य गोळा करून न्यू लॉ कॉलेजने आदर्श निर्माण केला – जी. डी. खानदेशे 

न्यू लॉ कॉलेजमध्ये अत्याधुनिक वेबसाईटचे विमोचन

अहमदनगर- न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथे नवीन अत्याधुनिक वेबसाईटचे विमोचन कार्यक्रम व पूरग्रस्तांसाठी संकलित केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदान करण्याच्या कार्यक्रमात प्राचार्य श्री. तांबे यांनी प्रास्ताविक केले व नवीन वेबसाईटसंबंधी माहिती सांगितली व पूरग्रस्तांसाठी संकलित केलेल्या शैक्षणिक साहित्य प्रदान करण्याचा हेतू विशद केला व उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी पत्रकार सुधीर लंके व वेबसाईट डिझायनर प्रा. सुपेकर यांचा व कार्यक्रमाचे अध्यक्ष व अ.जि.म.वि.प्र. समाजाचे सेक्रेटरी जी. डी. खानदेशे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वेबसाईट विमोचन श्री. खानदेशे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सुधीर लंके म्हणाले की, आपत्तीमध्ये उभे राहणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. देश संकटात असताना सर्व भेद विसरून उभे राहणे हे गरजेचे आहे. लोकमतने केलेल्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद दिला. योगदान दिले. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद व्यक्त केले. याप्रसंगी अनेक सामाजिक समस्यांची चर्चा झाली. न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प यानिमित्ताने करावे, असे आवाहन केले.

जी. डी. खानदेशे यांनी एक आगळीवेगळी वेबसाईट प्राचार्य श्री. तांबे यांनी निर्माण केली व आदर्श निर्माण केला, त्याचा इतरांनी धडा घ्यावा, तसेच विद्यार्थ्यांनी विविध उपयोगी शैक्षणिक साहित्य जमा केले. याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. प्रातिनिधीक स्वरूपात खानदेशे यांच्या हस्ते लंके यांच्याकडे शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले.

यावेळी हेमा कदम, प्रा. रामेश्‍वर दुसुंगे, प्रा. निवृत्ती कानवडे, प्रा. मोरे, प्रा. प्रियंका खुळे आदी उपस्थित होते. प्रा. रामेश्‍वर दुसुंगे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे यांनी केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा