मोहरमच्या सवार्‍यांचे शांततेत विसर्जन मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

अहमदनगर- नेप्ती (ता. नगर) येथे मोहरमच्या दहाव्या दिवशी गावातील नालासाब, इमामी कासम, मौला अली सवार्‍यांसह ताबूतचे धार्मिक वातावरणात विसर्जन करण्यात आले. गावातील सवार्‍यांच्या विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. या हसन-हुसेनच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीतून युवकांसह ग्रामस्थांनी धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले.

विसर्जन मिरवणुकीत माजी उपसरपंच फारुख सय्यद, माजी पं.स. सदस्य देवा (किसन) होले, मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार, सरपंच सुधाकर कदम, माजी सरपंच संजय जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, प्रा. एकनाथ होले, जमीर सय्यद, जावेद सय्यद, सत्तार सय्यद, बाबूलाल सय्यद, मुनीर सय्यद, हुसेन सय्यद, महेबुब सय्यद, साजिद सय्यद, सलीम सय्यद, अनिल पवार, वसीम सय्यद, युनूस सय्यद, मुक्तार सय्यद, गुलाब सय्यद, नजीर शेख, मिटूभाई सय्यद, हमीद सय्यद, वाजिद सय्यद, आसिफ सय्यद, नसिर सय्यद, रफिक सय्यद, कय्यूम सय्यद आदी गावातील युवक, ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

दरवर्षीप्रमाणे गावातील हिंदू, मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन मौलाना मुनीर सय्यद व हुसेन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सवार्‍यांची स्थापना केली होती. स्थापनेच्या दिवशी नाले हैदर यंग पार्टीच्यावतीने इमामवाडा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच दहा दिवस गावात इमामे हसन-हुसेन यांच्या जीवनाची माहिती देणार्‍या मजलीसचे आयोजन करण्यात आले होते. मजलीसनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मोहरमच्या आठव्या दिवशी रात्री 12 वाजता नाले हैदर यांच्या सवार्‍यांची मिरवणूक काढण्यात आली. नवव्या दिवशी कत्तलच्या रात्री व दहाव्या दिवशी पारंपारिक वाद्यात सवार्‍यांची मिरवणूक काढण्यात आली होती. चौका-चौकात सवार्‍यांवर चादर अर्पण करुन भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. पवार मळा येथील विहीरीत सवार्‍यांचे विसर्जन करण्यात आले. दहा दिवस धार्मिक वातावरणात मोहरमचे कार्यक्रम पार पडले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा