सोयाबीन चिली

 

 

 

सोयाबीन चिली बनवण्यासाठी साहित्य-

 • 1 चमचा टोमॅटो साॅस
 • 4 कप सोया चंक्स
 • 1 कांदा
 • 1 सिमला मिरची
 • 2 चमचा चिरलेली कोथिंबीर
 • आल/लसूण पेस्ट 2 चमचा
 • 1हिरवी मिरची वाटुन
 • मीठ चवीनुसार
 • व्हिनेगर 1 चमचा
 • 1 चमचा सोयासॉस
 • 1 चमचा काश्मिरी लाल तिखट
 • 2 चमचा कॉर्न स्टार्च
 • तळण्यासाठी तेल
 • सेजवान चटणी पॅकेट छोटे 1
 • पातीकांद्याची पात, बारीक चिरून 2 चमचा
 • पानकोबी 3 चमचा बारीक चिरुन
 • 1 चमचा बारीक चिरुन लसूण
 • कृती-

  पातेल्यात 5 कप पाणी उकळवावे. पाणी उकळले कि गॅस बंद करा यात सॉयाचंक्स घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. 10 मिनिटे झाले की पाणी काढून टाकावे. सोयाचंक्स घट्ट पिळून घ्या .
  सिमला मिरची चौकोनी आकारात कापून कांदा कापून घ्या कढईत तेल गरम करून त्यात सोयाचंक्स घालून तळून काढावेत
  तळल्यानंतर
  1 पॅन घेउन त्यात 2 चमचातेल गरम करावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण आणि आले घालून काही सेकंद परतावे
  चिरलेला कांदा आणि सिमला मिरची घालून मिक्स करा आता सोया सॉस, सेजवान चटणी , मीठ, आणि टॉमेटो केचप खायचा रंग घालून मिक्स करावे
  कॉर्न स्टार्च 1/2 वाटी पाण्यात मिक्स करावे. आणि हे मिश्रण पॅनमध्ये घालावे घट्ट पणायेण्यास घालावे आता तळलेले सोयाचंक्स आणि थोडे व्हिनेगर घालावे
  मिक्स करावे आणि एक-दोन मिनिटे शिजून घ्या 1 का प्लेट मध्ये काढून त्यावर पातीच्या कांद्याने , पानकोबी , कोथिंबीरीने सजवावे..

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा