ओमेगा 3 सप्लिमेंट्स ठरतात घातक!

ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हा घटक शरीरासाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर्स काही पूरक औषधं म्हणजेच सप्लिमेंट्सही देतात. मात्र या सप्लिमेंट्सच्या सेवनामुळे कोलेस्टरॉलची पातळी कमी होऊन हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं, असं म्हटलं जातं. मात्र अमेरिकेतल्या इंटर माउंटन हेल्थकेअर हार्ट इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार या गोळ्यांमधला डोकोसाहेकक्सिनोइ ॲसिड हा घटक हृदयविकाराच्या झटक्याला तसंच पक्षाघाताला कारणीभूत ठरतो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स काही माशांमधून मिळतात तर याच्या गोळ्यांमध्ये इकोसापॅनटोईनि ऍसिड (ईपीए) तसंच डोकोसाहेकक्सिनोइ ऍसिड (डीएचए) ही रसायनं असतात. यापैकी ईपीएमुळे हृदयविकार तसंच पक्षाघाताचा धोका कमी होत असला तरी डीएचएमुळे हा धोका वाढत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा