साप्ताहिक राशीभविष्य-दिनांक 13 ते 19 सप्टेंबर

मेष- संयम ठेवावे

ह्या आठवड्यात भाग्याची साथ लाभल्याचा आनंद होईल. इच्छित कार्य विनाविलंब पूर्ण होण्यास ग्रहमान मदत करतील. आरोग्याची काळजी घ्यावी. तारीख 13 ला मात्र महत्त्वपूर्ण कामे पुढे ढकलावीत. कुणाच्या वादविवादात पडू नये. मानसिक शांती भंग होण्याचे प्रसंग टाळावे. तारीख 15, 16 ला सकारात्मक अनुभव येतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायातून प्रगतीचे मार्ग दिसू लागतील. कार्यक्षेत्रात उन्नतीकारक संधी येतील.

वृषभ – ध्येयप्राप्तीविषयी जागरुक

रहावे ह्या आठवड्यात मिश्र स्वरूपाची फळे मिळतील. ज्यांना प्रॉपर्टीसंदर्भात कामे करायची आहे त्यांनी तारीख 16 पूर्वी करून घ्यावीत. तारीख 14, 15 ला महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळावे. मनोबल कमी करणार्‍या घटना टाळाव्यात. कुणाच्या वादात पडू नये. इतरांचे म्हणणे आपल्यास पटले नाही तरी शांत रहावे. वादविवाद टाळावा. जास्तकाही उलाढाल न करता आहे तेच कार्य शांतचित्तेने करावे हेच उत्तम राहील. रविचे भ्रमण ह्या आठवड्यात सिंह राशीतून कन्येत होणार आहे. तसेच गुरुचे वक्री भ्रमण मकर राशीत होणार आहे. 17 नंतर कामे मार्गी लागतील. लाभेश गुरूचे दशमातील भ्रमण कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढवेल.

मिथुन – मेहनत वाढवावी लागेल

ह्या आठवड्यात प्रॉर्टीची कामे करणार्‍यांना चांगल्या संधी चालून येतील. आरोग्याची काळजी घ्यावी. भागीदारी व्यवसाय करणार्‍यांना तारीख 15, 16 चांगले लाभ गेऊन जाईल. घरात आनंदी वातावरण असेल. जवळचे प्रवासाचे योग येतील. तारीख 17, 18 जपून कामे करावीत. उधारीचे व्यवहार टाळावेत. संयमाने व विचारपूर्वक निर्णय घ्यावे. वादविवाद टाळावेत. तारीख 19ला इच्छापूर्तीचा अनुभव येईल. तसे पाहता ह्या आठवड्यात जास्त काही अपेक्षित न ठेवता मेहनत व संयमाच्या बळावर वाटचाल करीत राहणे उत्तम राहील.

कर्क – वादविवाद टाळावे

ह्या आठवड्यात धनेश रविचे कन्या राशीत व भाग्येश गुरूचे सप्तमात भ्रमण होत आहे. भविष्याची योजना आखावी. जेणेकरून सध्या त्या दिशेने वाटचाल करता येईल. आरोग्याची काळजी घ्यावी. वरिष्ठांशी वादविवाद टाळावा. तारीख 17, 18 ला सकारात्मकता जाणवेल. तरीही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सावधानी बाळगावी लागेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेणे पुढे ढकलल्यास उत्तम राहील.

सिंह – आर्थिक कामे मार्गी लागतील

ह्या सप्ताहात राशीस्वामी रविचे स्वराशीतून धनस्थानात भ्रमण होणार आहे. तसेच अष्टमेश गुरूचे षष्ठात प्रवेश होणार आहे. आर्थिक कामे मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक कामे हातून घडतील. धार्मिक कामात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे पूर्ण होतील. सहलीचे आयोजन करण्याचा विचार मनी येईल. हौसमौज करण्यावर भर राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तारीख 17, 18 व्यवहार जपून करावेत. खाण्यावर लक्ष ठेवावे.

कन्या – सकारात्मक फळे मिळतील

ह्या सप्ताहात व्ययस्थानाचे स्वामी रविचे भ्रमण आपल्या राशीत होणार आहे. राशीस्वामी बुध हा स्वराशीत असल्याने निर्णय घेताना विचारपूर्वकच घ्याल. जुणी येणी वसूल होतील. धनस्थानात शुक्र त्याच्या स्वराशीत विराजित आहे. तसे पाहता ह्या आठवड्यात प्रगतीकारक संधी चालून येतील. इच्छित फलप्राप्ती होण्यास अनुकूल ग्रहमान लाभतील. विवाहइच्छुकांचे विवाह जमण्यास पोषक ग्रहमान आहे. तारीख 15, 16 ला घरात मांगलीक प्रसंग तसेच आनंदी वातावरण राहील.

तूळ-  खर्चावर नियंत्रण ठेवावे

आर्थिक कामे सप्ताहाच्या पूर्वार्धात पूर्ण करावी. प्रॉपर्टीची कामे करणार्‍यांना तारीख 17, 18 चांगल्या संधी मिळवून देईल. त्याचा लाभ घ्यावा. नोकरीत प्रगतीकारक घटना घडतील. वरिष्ठ खुश होतील. स्वतः च्या हौसमौजेवर खर्च करण्यावर भर असेल. आर्थिक नियोजन करून योग्य त्या ठिकाणीच खर्च करावा; कारण खर्चात वाढ होईल. नवीन गुंतवणूक करणे सध्या टाळावे.

वृश्चिक – प्रगती साधाल

राशीस्वामी लाभस्थानात आहे. ह्या आठवड्यात प्रगतीकारक संधी येतील. यशप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण योजना फलीत होतील. मनासारखे होईल. आर्थिक उन्नतीकारक ग्रहमान लाभतील. कार्यक्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर समाजात नावलौकिक मिळवाल. महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु – यशदायी कालावधी

मनोबल उंचावेल. कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी हातून घडेल. नवीन संधी द्वार ठोठावतील त्याचा लाभ घ्यावा. आता घेतलेल्या निर्णयांचा भविष्यात लाभ होईल. आर्थिक बाजू बळकट होईल. जुनी येणी वसूल होतील. भाग्याची साथ मिळाल्याचा अनुभव येईल. एकंदरीत हा आठवडा आपणास आनंदी, उत्साही व यशदायी ठरेल.

मकर –  मिश्र ग्रहमान

सध्या मिश्र स्वरूपाचे ग्रहमान आहे. आठवड्याच्या सुरुवातीला जपून कार्य करावे. वादविवाद टाळावे. महत्त्वपूर्ण निर्णय विचारपूर्वक करावे. कर्मभाव स्वामी स्वराशीत, भाग्येश भाग्यस्थानात असल्याने तसे पाहता हा सप्ताह लाभदायी ठरेल. संयम जरुरी आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे.

कुंभ  – वादविवाद टाळावे

उधारीचे व्यवहार टाळावे. जुनी येणी वसूल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. मनी जे चिंतले ते पूर्ण होण्यासाठी मेहनत व संयम बाळगावे लागेल. भागीदारी व्यवसायधारकांना अनुकूलता जाणवेल. नवनवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवनात कटुता जाणवेल. शांत राहणे उत्तम. वादविवाद टाळावे अन्यथा नातेसंबंधात तणाव वाढण्याची शक्यता.

मीन – मेहनतीचे फळ मिळेल

यशदायी कालावधी असेल. आपण केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. शांतपूर्वक निर्णय घेण्याचा आपला स्वभाव आपणास फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक कामे हातून घडतील. व्यवसायात आलेल्या संधीचा लाभ उठवावा. –

ॲस्ट्रो वास्तुविद – सौ. पूजा गुंदेचा,  

भाग्यलक्ष्मी ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट मोबा. 9112131415

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा