उघड्यावर मेडिवेस्ट जाळणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करा – अन्यथा आंदोलनाचा आयुक्तांना इशारा

अहमदनगर – हॉस्पिटलमधील मेडिवेस्ट वस्तू खुलेआम जाळल्या जातात अशा हॉस्पिटलवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेच्यावतीने मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, नगर तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेडाळे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, युवा प्रमुख शंभु नवसुपे आदि उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या जवळपास असताना, ही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसतायेत. एका हॉस्पिटलमधील मावशीने हॉस्पिटलमधील मेडिवेस्ट जसे की पेशंटच्या वापरलेल्या कवळ्या, इंजेक्शन, हँडग्लोव्हस या वस्तू खुलेआम जाळल्या. शिव राष्ट्र सेनेचे संतोष नवसूपे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या मावशींना मेडिवेस्ट जळाल्याबद्दल विचारणा केली असता, मावशींनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. या भागातल्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता हॉस्पिटलने देखील काही बोलण्यास नकार दिलाय. या जळालेल्या मेडिवेस्टमुळे परिसरातील नागरीकांच्या जीवाला धोका आहे. या गोष्टीची लवकरात लवकर चौकशी करून, ज्या हॉस्पिटलचा कचरा जाळला आहे, त्या हॉस्पिटलवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे संतोष नवसूपे यांनी केलीय. या गोष्टीवर कारवाई न झाल्यास शिव राष्ट्र सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नवसुपे यांनी दिला. याप्रसंगी उपायुक्त प्रदीप पठारे यांनी याबाबत संबंधितांना सूचना देऊन, कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा