आयुर्वेदीय बालसंस्कार – अपुर्‍या दिवसांचे व कमी वजनाचे बाळ

म्हणून फक्त तुम्ही तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा आणि चिकाटीने बाळाचे आरोग्य जपून वजन वाढविण्याचा प्रयत्न करा. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. बेन्जामिन स्पोक म्हणतात, की ’मातांनो, स्वत:वर विश्वास ठेवा. तुमच्या कल्पनेपेक्षाही तुम्हाला जास्त माहिती असते.’ खरेतर मी काही बालरोगतज्ज्ञ नाही. एक स्त्री-रोग व आयुर्वेदतज्ज्ञ असले, तरीही एक आई म्हणून दुर्वाला वाचविताना जी काही काळजी घेतली आहे, ती आज मी म ुद्देसूदपणे तुम्हाला सांगणार आहे.

– अपुर्‍या वजनाच्या बाळाची विशेष काळजी का घ्यावी लागते? मा जन्माच्या वेळी दोन किलोग्रॅमपेक्षा कमी वजन असणार्‍या बाळास कमी वजनाचे बाळ म्हणतात. आहाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गर्भवती मातेचे कुपोषण, रक्तक्षय, गर्भावस्थेतील रक्तदाब, अति काळजी, चिंता, अति श्रम, गर्भवतीला वारंवार मूत्रम ार्गाचा जंतुसंसर्ग होणे, मलेरिया, टायफॉईड यांसारखे आजारपण, धूम्रपान व तंबाखूसारखी व्यसने असणे यांमुळेही गर्भावस्थेचे दिवस पूर्ण भरूनही कमी वजनाचे बाळ जन्माला येते. खझझएठ बाळाचे वजन दोन ते अडीच किलो असेल व त्याची तब्येत स्थिर असेल, तर बाळाला एन.आय.सी.यु.मध्ये दाखल करण्याची अगदीच गरज पडत नाही. जी बाळे अपुर्‍या दिवसांमध्ये जन्माला आल्यामुळे कमी वजनाची असतात, अशा बाळांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जन्मापूर्वीच्या शेवटच्या काही महिन्यांत बाळाचा महत्त्वपूर्ण विकास व शारीरिक व मानसिक वाढ होत असते. शेवटच्या दोन महिन्यांम ध्ये बाळाच्या शरीराचा व मेंदूचा आकार व वजन झपाट्याने वाढत 155 जाता असते.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर

वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर

मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा