कोरोना महामारीच्या संकटात माणुसकीचा धर्म जपणे महत्वाचे-शहरजिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे; भाजपातर्फे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

अहमदनगर- आज सर्व जगात एकच नाव कोरोना वायरस ज्याने सर्वांपुढे जगण्यासाठी एक भितीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेकांनी यामध्ये आपला जीवही गमवला आहे. सर्वांनी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. ज्यांना हे शक्य नाही किंवा ज्यांची कुवत नाही त्यांना सर्वांनी मिळून कोणत्याही वस्तूची आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे. कारण कोरोनाच्या महामारीत माणुसकीचा धर्म महत्वाचा आहे. असे प्रतिपादन भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले. भाजपा तर्फे आर्सेनिक अल्बम थर्टी या होमिओपॅथीक रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या गोळ्यांचे समाजातील तृतीयपंथीय घटकांपर्यंत पोचवण्यासाठी अध्यक्ष काजल गुरु यांच्याकडे भाजपचे शहरजिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सुपूर्त केल्या. यावेळी सरचिटणीस महेश नामदे, सोशल मिडीया संयोजक हुझेफा शेख, युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश नाकाडे, सचिव अभिषेक वराळे, कुणाल गंभीर, अरबाज शेख, किशोर फरताळे, मंदार गंधे, ऋग्वेद गंधे सह कार्यकर्ते उपस्थित होते. गंधे पुढे म्हणाले सर्वाना आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठी नियमांचे पालन केलेच पाहिजे. नगर शहरात अनेक नागरिक स्वत:च्या तोंडावर मास्क लावत नाहीत आणि बाजारपेठेत फिरतात. अनेक जण सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नाही. ही सर्व लक्षण आपल्या व नगरकरांसाठी धोक्याची आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक नियम पाळा, असे आवाहन त्यांनी केले.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा