धूत इंग्लिश स्कूल व मानधना कॉलेजमध्ये ऑनलाइन हिंदी दिवस साजरा

अहमदनगर- श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडियम स्कूल व मोहनलाल रामावतार मानधना ज्युनिअर कॉलेजमध्ये कोरोनाचे संकट असूनही विद्यार्थ्यांनी घरीच सुरक्षित राहून ऑनलाइनद्वारे आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन हिंदी दिवस साजरा केला. या स्पर्धेचे परीक्षण सौ.शालिनी मालविया (पुणे) व सौ.पूजा म्हस्के यांनी ऑनलाइन केले. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हिंदी दिनाचे औचित्य साधून विद्यालयात चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा, वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर तयार करणे, स्वरचित नाटिका लेखन काव्यलेखन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला विद्यालयाच्या प्राचार्या राधिका जेऊरकर, पर्यवेक्षिका सौ.पुजारी, संपदा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धांचे परीक्षण केलेल्या सौ. पूजा म्हस्के म्हणाल्या, मुलांनी त्यांच्या कल्पनेने अर्थपूर्ण संदेश देणारी चित्रे योग्य रंग संगती रेखाटली. सर्व चित्रे अप्रतिम होती. तसेच सौ शालिनी मालविया (पुणे) यांनीही स्पर्धेमध्ये भाग घेणे ही एक चांगलीच गोष्ट आहे, पण या कोरोनाच्या काळात उपलब्ध असलेल्या साधनांचा व तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर करून तुम्ही ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभागी झालात ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे, असे सांगत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील शिक्षिका सौ.रथल लोंढे व सौ.कल्याणी नजान यांनी केले होते. यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर व मोहनलाल मानधना, सचिव डॉ. शरद कोलते, सहसचिव राजेश झंवर, सभासद बजरंग दरक व संस्थेच्या इतर सर्व सभासदांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा