गोदरेजचा ‘न्यू इन्व्हर्टर एसी’ नगरच्या कुबेर इंपोर्टसमध्ये दाखल

अहमदनगर- दाढीचे ब्लेड ते मजबूत तिजोर्‍यापर्यंत टिकाऊ गृहोपयोगी वस्तू तयार करणार्‍या गोदरेज कंपनीने आपला नवा हेवी ड्युटी इन्व्हर्टर ए सी लाँच केला आहे. घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत सर्वोत्कृष्ठ वितरक ठरलेल्या नगरमधील कुबेर इंपोर्टसमध्ये हा फाईव्ह स्टार रेटिंग ए सी दाखल झाला आहे. कुबेर मार्केटच्या तेलीखुंट एम. जी. रोडवरील दालनात यांची विक्री सुरु करण्यात आली आहे. गोदरेज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मयांक दीक्षित, विक्री व्यवस्थापक रोनाक डुंगरवाल यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला.

कुबेर इंपोर्टसचे संचालक श्रीप्रसाद पतके, श्रीचरण पतके, श्रीविशाल पतके यांनी मान्यवराचे स्वागत केले . यावेळी बोलताना मयांक दीक्षित यांनी कुबेर इंपोर्टसच्या ग्राहकाभिमुख सेवा वृत्तीचे कौतुक केले व कंपनीच्या उत्पादनाविषयी माहिती दिली. कंपनीने लाँच केलेला ए सी हा फाईव्ह स्टार रेटिंगचा ए सी आहे. लाईट गेल्यानंतर हा ए सी इन्व्हर्टरवर देखील चालू शकतो. यावेळी श्रीप्रसाद पतके म्हणाले की, चिनी तसेच विदेशी कंपन्यांच्या स्पर्धे त हा ए सी संपूर्णपणे स्वदेशी गोदरेज कंपनीने बनविलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर या संकल्पनांची पूर्ती या उत्पादनांतून होते आहे. एक, दीड आणि 2 टनांच्या रेंज मध्ये कुबेरमध्ये हे ए सी उपलब्ध आहेत.

अवघ्या 399 रुपयात कुबेर ए सी इन्स्टॉलेशन करून देणार आहे. गोदरेजचा हा नवा ए सी वीज बचत करणारा आणि इको फ्रेंडली देखील आहे. अतिशय स्वस्तात कंपनीने हा ए सी बाजारात आणला आहे. तसेच कंपनीने याला 5 वर्षे संपूर्ण वॉरंटी दिली आहे. तसेच कॉम्प्रेसरसाठी 10 वर्ष वॉरंटी देण्यात आली आहे. ग्राहक खूप दिवसापासून या इन्व्हर्टर ए सी ची वाट पाहत होते. ऑक्टोबर हिटचा चटका नगरकरांना जाणण्यास सुरुवात होण्या अगोदर अनेकांनी या ए सी च्या खरेदीसाठी बुकिंग केले होते. कंपनीच्या अधिकार्‍याच्या हस्ते कुबेरच्या मान्यवर ग्राहकांना यावेळी याचे वितरण करण्यात आले. यावेळी कुबेर इंपोर्टसचे विक्री प्रतिनिधी सुशांत कहाणे फिरोज खान, जुबेर शेख तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा