आयुर्वेदिक गर्भसंस्कार

त्या वेळेस प्रथमतः अन्नाची पूजा करून अन्नप्राशन संस्कार केला जातो. सहाव्या महिन्यामध्ये बाळाला वरण भाताचे पाणी, फळांचे रस, नाचणी सत्त्व सुरू करावे. यातील पहिले अन्न बाळाला देताना या अन्नापासून माझ्या बाळाची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होऊन त्याच्या आरोग्याचे रक्षण व्हावे अशी ईश्वराजवळ प्रार्थना करावी व खालील अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणून बाळाला पहिला घास भरवावा. अन्नपूर्णा देवी मंत्र : श्री ह्रीं क्लीं नमो भगवति अन्नपूर्ण ममाभिलषितमन्नं देहि देहि स्वाहा । दर्शनसिद्धि भवति ॥ 8) कर्णवेधन संस्कार : बाळ सव्वा महिन्याचे झाल्यानंतर शुभदिवशी कान टोचले जातात. मुलगा असल्यास पहिल्यांदा उजवा कान व मुलगी असल्यास पहिल्यांदा डावा कान टोचवावा यालाच कर्णवेधन संस्कार म्हणतात. 9) मुंडण संस्कार : जन्मानंतर काही महिन्यांनी शुभदिवशी बाळाचे जावळ काढतात यालाच मुंडण संस्कार म्हणतात. 10) उपनयन संस्कार : या उपनयन संस्कारालाच मुंज करणे असे म्हणतात. उपनयनचा अर्थ जवळ घेऊन जाणे. हा संस्कार, वयाच्या आठव्या वर्षी केला जातो. बालक आध्यात्मिक जीवनात प्रवेश करतो; म्हणून त्याचा दुसरा जन्म मानला जातो. शुभदिवशी अन्नदेवता, ब्राह्मण व वैद्य यांचे पूजन करावे व अग्निकुंडामध्ये दही, मध, साजूक तूप यांची आहुती द्यावी. ॐ भूः स्वाहा: या ॐकाराचा विधीपूर्वक जप करून घृताची आहुती देत राहावी. 11) वेदारंभ संस्कार : बालकाचे वय शिक्षणाच्या योग्य झाल्यानंतर गुरू किंवा पित्याकडून हा संस्कार केला जातो. आपले बालक वयाच्या चौथ्या व पाचव्या वर्षी ज्ञानार्जनासाठी जेव्हा शाळेत जाईल त्या शुभदिवशी वेदारंभ संस्कार करावा. 12) समावर्तन संस्कार : शिक्षण संपल्यानंतर ज्ञानार्जन प्राप्त करून परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर आपल्या गुरूंकडून आशीर्वाद घेऊन गुरुकुलाचा म्हणजेच आताच्या काळात कॉलेजचा निरोप घेण्याच्या क्रियेला समावर्तन संस्कार म्हणतात. 13) विवाह संस्कार : योग्य वय असलेले स्त्री व पुरुष आयुष्यभर एकमेकांची साथ देण्यासाठी व अपत्य जन्माच्या हेतूने एकत्र येतात, एकमेकांशी बांधले जातात. यालाच विवाहसंस्कार म्हणतात. विवाहसंस्कारामधून गृहस्थाश्रमाची सुरुवात होते. पुरुषाचे विवाह करते वेळी वय कमीत कमी 25 वर्षे असावे व तो शक्तीसंपन्न असावा आणि स्त्रीचे वय कमीत कमी 18 वर्षांचे किंवा त्याहून अधिक असावे. (क्रमश:)

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा